इंग्लंडची भारतावर आघाडी
By admin | Published: February 16, 2017 12:15 AM2017-02-16T00:15:08+5:302017-02-16T00:15:08+5:30
इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या ५०१ धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने ४३१ धावांवर डाव घोषित केला. यामुळे इंग्लंडला ७० धावांची आघाडी मिळाली.
नागपूर : इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या ५०१ धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने ४३१ धावांवर डाव घोषित केला. यामुळे इंग्लंडला ७० धावांची आघाडी मिळाली. पाहुण्यांनी दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर एक गडी गमावून २३ धावा केल्या आहेत, हॅरी ब्रुक (१५) आणि हेन्री ब्रुक्स (०) धावा करून खेळपट्टीवर कायम आहेत.
आज गुरुवार सामन्याचा शेवटचा दिवस असून, उभय संघांचा एक डाव शिल्लक असल्यामुळे सामना अनिर्णीत राहण्याची शक्यता बळावली आहे. जामठा येथील व्हीसीए स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात भारताने २ बाद १५६ धावांवरून तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केला. नाबाद फलंदाज सौरभ सिंग (५३) आणि जाँटी सिद्धू (२३) हे १७६ धावांवर बाद झाले. लियाम व्हाईटने जाँटी सिद्धूचा (३३) त्रिफळा उडविला, तर हेन्री ब्रुक्सने सौरभ सिंगला ६२ धावा (१३७ चेंडू, ११ चौकार) पायचित केले.
चिवट फलंदाजी करीत फेरारिओने १५१ चेंडूंत १३ चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. त्याने १७३ चेंडंूत १४ चौकारांच्या मदतीने ११७ धावा केल्या. सिजोमोन जोसेफही अर्धशतक नोंदविण्यात यशस्वी ठरला. जोसेफ ६२ धावा ९६ चेंडू, ७ चौकार आणि विनीत पन्वर (४) धावांवर नाबाद राहिले. इंग्लंडच्या हेन्री ब्रुक्स, लियाम व्हाईट, इआॅन वुड्सने प्रत्येकी दोन गडी बाद केले. इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही हॅरी ब्रुक व मॅक्स होल्डनने केली. कनिश सेटने होल्डनला (८) धावांवर पायचित केले. (क्रीडा प्रतिनिधी)
धावफलक-
इंग्लंड (पहिला डाव) : ५ बाद ५०१ (डाव घोषित)
भारत (पहिला डाव-२ बाद १५६ वरून पुढे) : सौरभ सिंग पायचित गो. ब्रुक्स ६२, जाँटी सिद्धू त्रि.गो. व्हाईट ३३, रविंदर ठाकूर पायचित गो. वुड्स ३१, डॅरिल फेरारिओ त्रि.गो. ब्रुक्स ११७, एस. लोकेश्वर त्रि.गो. वुड्स २२, कनिश सेठ पायचित गो. रॉलिन्स ४, सिजोमोन जोसेफ नाबाद ६२,, विनीत पन्वर नाबाद ४. अवांतर-१७, एकूण १२२ षटकांत ८ बाद ४३१ डाव घोषित. गडी बाद क्रम : १-२३, २-१२०, ३-१७६, ४-१७६, ५-२६३, ६-३२३, ७-३३४, ८-३८६.
गोलंदाजी : आरोन बिअर्ड १२-१-६५-१, हेन्री ब्रुक्स २४-९-७५-२, आर्थर गोडसल १३-२-४६-०, लियाम व्हाईट ३७-४-१०४-२, डेलरे रॉलिन्स १४-४-४८-१, मॅक्स होल्डन ८-०-२१-० , इआॅन वुड्स १४-२-५५-२. इंग्लंड (दुसरा डाव) : हॅरी ब्रुक खेळत आहे १५, मॅक्स होल्डन पायचित गो.सेठ ८, हेन्री ब्रुक्स खेळत आहे ०. अवांतर-०, एकूण-९ षटकांत १ बाद २३. गडी बाद क्रम : १-२३. गोलंदाजी : कनिश सेठ ४-३-८-१, रिषभ भगत २-१-८-०, डॅरिल फेरारिओ १-०-३-०, विनीत पन्वर १-०-३-०, सिजोमोन जोसेफ १-०-१-०.