इंग्लंडने केली कांगारुंची शिकार

By Admin | Published: October 11, 2016 04:43 AM2016-10-11T04:43:54+5:302016-10-11T04:43:54+5:30

इंग्लंडने विश्वचषक कबड्डी स्पर्धेत गुणांचे खाते उघडताना ‘अ’ गटामध्ये आॅस्टे्रलियाचा ६९-२५ असा धुव्वा उडवला. सलामीला इंग्लंडला तुलनेत

England made hunt for Kangaroo | इंग्लंडने केली कांगारुंची शिकार

इंग्लंडने केली कांगारुंची शिकार

googlenewsNext

अहमदाबाद : इंग्लंडने विश्वचषक कबड्डी स्पर्धेत गुणांचे खाते उघडताना ‘अ’ गटामध्ये आॅस्टे्रलियाचा ६९-२५ असा धुव्वा उडवला. सलामीला इंग्लंडला तुलनेत बलाढ्य असलेल्या बांगलादेशकडून १८-५२ असा दारुण पराभव पत्करावा लागला होता.
सुरुवातीपासून आक्रमक खेळ केलेल्या इंग्लंडने आॅस्टे्रलियाला अखेरपर्यंत दडपणाखाली ठेवले. आक्रमणावर भर देताना इंग्लंडने खोलवर चढायांचा सपाटा
लावताना कांगारुंची सहज शिकार केली. विशेष म्हणजे, टोपे अ‍ॅडवलुरे याने सर्वाधिक २२ गुणांची वसूली करताना आक्रमणात २० तर बचावामध्ये २ गुण मिळवले. त्याचवेळी, केशव गुप्ता याने चढाईमध्ये १४ गुणांची कमाई करीत अ‍ॅडवलुरेला चांगली साथ दिली. कर्णधार सोमेश्वर कालियाने अष्टपैलू खेळ करताना आक्रमणात ८ आणि बचावामध्ये ३ गुणांसह ११ गुण मिळवले.
मध्यंतरालाच इंग्लंडने ३५-११ अशी आघाडी सामन्यावर मजबूत पकड मिळवली होती. यानंतर आॅस्टे्रलियाने पुनरागमनाचा काहीसा प्रयत्न केला. मात्र, वाढत जाणाऱ्या आघाडीच्या दडपणाखाली दबल्याने त्यांच्याकडून अनेक चुका झाल्या. याचा अचूक फायदा घेत इंग्लंडने आॅसीला अखेरपर्यंत संधी दिली
नाही. टीम आॅसीकडून अ‍ॅडम स्नेडर (९) आणि थॉमस शार्प (८) यांनी
अपयशी झुंज दिली. इंग्लंडने सामन्यात तब्बल लोण चढवताना आॅस्टे्रलियाच्या आव्हानातली हवाच काढली. (वृत्तसंस्था)

Web Title: England made hunt for Kangaroo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.