एकदिवसीय मालिकेत 444 धावा करून इंग्लंडनं रचला विश्वविक्रम

By admin | Published: August 30, 2016 10:50 PM2016-08-30T22:50:48+5:302016-08-30T22:50:48+5:30

इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान तिस-या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडनं 444 धावांची आघाडी उभारली आहे.

England record 444 runs in ODIs | एकदिवसीय मालिकेत 444 धावा करून इंग्लंडनं रचला विश्वविक्रम

एकदिवसीय मालिकेत 444 धावा करून इंग्लंडनं रचला विश्वविक्रम

Next

ऑनलाइन लोकमत

नॉटिंगहॅम, दि. 30- इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान तिस-या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडनं 444 धावांची आघाडी उभारली आहे. इंग्लंडनं क्रिकेटच्या एकदिवसीय सामन्यात इतिहासात नोंद घ्यावी, अशी सर्वोच्च धावसंख्या रचली आहे. याआधी श्रीलंकेनं 2006मध्ये नेदरलँडविरुद्ध खेळलेल्या एकदिवसीय सामन्यात 443 धावांची खेळी केली होती.

मात्र श्रीलंकेचा रेकॉर्ड मोडत इंग्लंडनं पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात 444 धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या अ‍ॅलेक्स हेल्सची 171 धावांची खेळी केली आहे. या तिस-या एकदिवसीय सामान्यात इंग्लंडच्या हेल्स आणि रुटनं 248 धावांची भागीदारी केली आहे.

तर मॉर्गेन आणि बटलर या दोघांनी शेवटपर्यंत नाबाद खेळत 161 धावांची भागीदारी केली आहे. इंग्लंडनं केलेल्या 444 धावा ही एकदिवसीय मालिकेतील सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे.

Web Title: England record 444 runs in ODIs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.