इंग्लंडमध्ये फिरकी गोलंदाजांना थर्ड क्लास समजतात - ग्रॅमी स्वान

By admin | Published: November 4, 2016 03:44 PM2016-11-04T15:44:11+5:302016-11-04T16:16:01+5:30

२०१२ च्या भारत दौ-यात आम्ही केलेल्या कामगिरीची सध्याचा इंग्लिश संघ पुनरावृत्ती करु शकत नाही असे मत इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज..

In England, the spinners think of third class - Graeme Swann | इंग्लंडमध्ये फिरकी गोलंदाजांना थर्ड क्लास समजतात - ग्रॅमी स्वान

इंग्लंडमध्ये फिरकी गोलंदाजांना थर्ड क्लास समजतात - ग्रॅमी स्वान

Next

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ४ - भारत दौ-यावर आलेल्या इंग्लंड संघाकडून फारशी अपेक्षा बाळगण्यात अर्थ नाही. २०१२ च्या भारत दौ-यात आम्ही केलेल्या कामगिरीची सध्याचा इंग्लिश संघ पुनरावृत्ती करु शकत नाही असे मत इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज ग्रॅमी स्वानने व्यक्त केले आहे. २०१२ च्या भारत दौ-यात इंग्लंड संघाने कसोटी मालिका २-१ अशी जिंकली होती. 
 
ग्रॅमी स्वान आणि माँटी पानेसर ही फिरकी दुकली प्रचंड यशस्वी ठरली होती. फिरकी गोलंदाजी सहज खेळून काढण्यात हातखंडा असलेल्या भारतीय फलंदाजांचा या दोघांसमोर निभाव लागला नव्हता. आमच्या देशात फिरकी गोलंदाजीला गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे आम्ही उपखंडात जातो त्यावेळी आमच्या चमूत वर्ल्डक्लास गोलंदाजाचा अभाव असतो असे स्वानने सांगितले. 
 
आमच्याकडे चांगला संघ आहे पण भारतात आम्ही जिंकू शकत नाही कारण आमच्याकडे फिरकी गोलंदाज थर्ड क्लास नागरीक समजले जाते. फिरकी गोलंदाजाला पाठबळ देण्यासाठी आमच्याकडे कोणतीही व्यवस्था नाही अशी खंत स्वानने व्यक्त केली.
 

Web Title: In England, the spinners think of third class - Graeme Swann

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.