इंग्लंड संघाचा भारत दौरा नोव्हेंबरमध्ये
By admin | Published: July 16, 2016 02:40 AM2016-07-16T02:40:34+5:302016-07-16T02:40:34+5:30
पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड संघ नोव्हेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. यापैकी चौथा कसोटी सामना मुंबईत ८ ते १२ डिसेंबर या कालावधीत खेळविला जाईल.
नवी दिल्ली : पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड संघ नोव्हेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. यापैकी चौथा कसोटी सामना मुंबईत ८ ते १२ डिसेंबर या कालावधीत खेळविला जाईल. फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यात प्रत्येकी तीन वन डे आणि टी-२० सामने देखील खेळविले जातील. पुण्यात १५ जानेवारी २०१७ रोजी पहिला वन डे होणार असून नागपुरात २९ जानेवारी रोजी दुसऱ्या टी-२० लढतीचे आयोजन होईल.
पहिला कसोटी सामना राजकोट येथे ९ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत होईल. दुसरी कसोटी विशखापट्टणममध्ये १७ ते २१ नोव्हेंबर तसेच तिसरी कसोटी २६ ते ३० नोव्हेंबरदरम्यान मोहालीत होणार आहे. मुंबईत चौथा सामना ८ ते १२ डिसेंबरदरम्यान तसेच पाचवा सामना १६ ते ३० डिसेंबरदरम्यान चेन्नईत होईल. सर्व कसोटी सामने सकाळी ९.३० पासून सुरू होणार असून दिवस-रात्री एकही सामना खेळविण्यात येणार नाही. वन डे सामने मात्र दुपारी २.३० पासून डे नाईट खेळविले जातील.
कसोटी मालिका खेळल्यानंतर इंग्लंड संघ ख्रिसमससाठी मायदेशी परत जाईल. नंतर वन डे मालिकेसाठी पुनरागमन होईल.
१५ जानेवारी २०१७ रोजी पहिला वन डे पुण्यात होईल. त्यापाठोपाठ कटक येथे १९ ला, कोलकाता येथे २३ ला, सामने होतील. तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कानपूर येथे २६ जानेवारी रोजी, दुसरा सामना नागपुरात २९ जानेवारी रोजी आणि तिसरा सामना बेंगळुरु येथे १ फेब्रुवारी रोजी खेळल्या जाणार आहे.(वृत्तसंस्था)
वेळापत्रक
पहिली कसोटी
९ ते १३ नोव्हेंबर राजकोट
दुसरी कसोटी
१७ ते २१ नोव्हेंबर विशाखापट्टणम
तिसरी कसोटी
२६ ते ३० नोव्हेंबर मोहाली
चौथी कसोटी
८ ते १२ डिसेंबर मुंबई
पाचवी कसोटी
१६ ते २० डिसेंबर चेन्नई
पहिला वन डे
१५ जानेवारी पुणे
दुसरा वन डे
१९ जानेवारी कटक
तिसरा वन डे
२२ जानेवारी कोलकाता
पहिला टी-२०
२६ जानेवारी कानपूर
दुसरा टी-२०
२९ जानेवारी नागपूर
तिसरा टी-२०
१ फेब्रुवारी बेंगळुरू.