मोर्गनच्या शतकी खेळीमुळे इंग्लंड विजयी

By admin | Published: May 26, 2017 03:31 AM2017-05-26T03:31:19+5:302017-05-26T03:31:19+5:30

कर्णधार इयोन मोर्गनच्या शानदार शतकी खेळीच्या बळावर इंग्लंडने पहिल्या वन डेत द. आफ्रिकेचा ७२ धावांनी पराभव

England won by Morgan's century | मोर्गनच्या शतकी खेळीमुळे इंग्लंड विजयी

मोर्गनच्या शतकी खेळीमुळे इंग्लंड विजयी

Next

लिड्स : कर्णधार इयोन मोर्गनच्या शानदार शतकी खेळीच्या बळावर इंग्लंडने पहिल्या वन डेत द. आफ्रिकेचा ७२ धावांनी पराभव
करीत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. आयसीसी वन डे क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या आफ्रिकेवर विजय नोंदवित यजमान संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी मिळविली.
विजयासाठी ३४० धावांचे लक्ष्य गाठणारा द. आफ्रिका संघ पाच षटकांआधीच ३६७ धावांत बाद झाला. हाशिम अमला आणि फाफ डु प्लेसिस यांनी दुसऱ्या गड्यासाठी केलेली ११२ धावांची भागीदारीदेखील विजय मिळवून देऊ शकली नाही. त्याआधी मोर्गन (१०७ धावा) दहावे वन डे शतक ठोकताच इंग्लंडने ६ बाद ३३९ अशी मजल गाठली.
संघाचे पाच गडी १९८ धावांत बाद होऊनही मोर्गन-मोईन अली यांनी सहाव्या गड्यासाठी ११७ धावांची भागीदारी केली. अली ७७ धावांवर नाबाद राहिला. दोघांनीही प्रत्येकी पाच षटकार मारले. अलीने नंतर दोन गडी बाद करताच त्याला सामनावीराचा पुरस्कार बहाल करण्यात आला. (वृत्तसंस्था)

स्टोक्सच्या फिटनेसची अफवा मोर्गनने फेटाळली
बेन स्टोक्सच्या फिटनेसबद्दलची अफवा कर्णधार इयोन मोर्गन याने फेटाळून लावली. आयपीएलमध्ये सर्वाधिक यशस्वी ठरलेला स्टोक्स बुधवारी येथे परतला. त्याने पहिल्या वन डेत केवळ दोनच षटके गोलंदाजी केली. यावर मोर्गन म्हणाला, ‘स्टोक्स फिटनेसमध्ये यशस्वी ठरला आहे. त्याने दोन षटके टाकली, तरी सामन्यावर पकड निर्माण केल्यामुळे त्याच्या गोलंदाजीची गरज भासली नाही. आम्हाला विकेट मिळत असताना स्टोक्सला गोलंदाजी करायला लावून जोखिम पत्करायची नाही, असा मी निर्णय घेतला होता.’ स्टोक्सच्या गुडघ्यावर मागच्यावर्षी शस्त्रक्रिया झाली.

Web Title: England won by Morgan's century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.