इंग्लंडचा लंकेवर सहा गड्यांनी विजय, मालिकेत २-० ने आघाडी
By admin | Published: June 30, 2016 05:52 PM2016-06-30T17:52:46+5:302016-06-30T17:52:46+5:30
जेसन राय याने फटकविलेल्या १६२ धावांच्या बळावर इंग्लंडने श्रीलंकेचा सहा गड्यांनी पराभव करीत पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी मिळविली आहे
ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. ३० : जेसन राय याने फटकविलेल्या १६२ धावांच्या (११८ चेंडू, १३ चौकार, ३षटकार) बळावर इंग्लंडने चौथ्या वन डेत श्रीलंकेचा सहा गड्यांनी पराभव करीत पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी मिळविली आहे. अंतिम लढत
कार्डिफ येथे शनिवारी होईल. द. आफ्रिकेत जन्मलेल्या रायने इंग्लंडसाठी वन डेतील दुसरी सर्वोच्च खेळी केली. पण संघासाठी सर्वोच्च खेळीचा विक्रम केवळ पाच धावांनी हुकला. १९९३ साली रॉबिन स्मिथ याने आॅस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १६७ धावा ठोकून
सर्वोच्च खेळीचा विक्रम नोंदविला होता. रायचे तीन वन डेत हे दुसरे शतक होते. त्याच्या खेळीच्या बळावर इंग्लंडने ३०८ धावांचे लक्ष्य सहज गाठले.
नुआन प्रदीपने रायची दांडी गूल केली. रायला साथ देत ज्यो रुट याने ६५ धावा ठोकल्या. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी १४९ धावा फटकविल्या. त्याआधी श्रीलंकेकडून चार फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केल्यामुळे पावसाच्या व्यत्ययात लंकेने ४२ षटकांत ५ बाद ३०५ धावा उभारल्या होत्या. कुशाल मेंडिसने १३ चौकारांसह ७७, गणाथिलाकाने ७ चौकारांसह ६२, चांदीमलने ६३ आणि
कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने नाबाद ६७ धावा ठोकल्या. यानंतर इंग्लंडला विजयासाठी ३०८ धावांचे नवीन लक्ष्य निर्धारित करून देण्यात आले होते.