इंग्लंडने कसोटी मालिका जिंकली
By admin | Published: May 31, 2016 03:40 AM2016-05-31T03:40:23+5:302016-05-31T03:40:23+5:30
इंग्लंडने आपला कर्णधार अॅलेस्टर कुकच्या कसोटी क्रिकेटमधील दहाहजारी बनण्याचा आनंद श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या क्रिकेट कसोटीच्या चौथ्याच दिवशी सोमवारी ९ विकेटने शानदार विजय मिळवून साजरा केला.
चेस्टर ली स्ट्रीट : इंग्लंडने आपला कर्णधार अॅलेस्टर कुकच्या कसोटी क्रिकेटमधील दहाहजारी बनण्याचा आनंद श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या क्रिकेट कसोटीच्या चौथ्याच दिवशी सोमवारी ९ विकेटने शानदार विजय मिळवून साजरा केला.
इंग्लंडने पहिली कसोटी तीन दिवसांच्या आत डावाने जिंकली होती आणि दुसरी कसोटीदेखील चार दिवसांच्या आत संपवताना तीन सामन्यांच्या मालिकेत २-0 अशी निर्णायक आघाडी घेतली.
इंग्लंडने विजयासाठीचे ७९ धावांचे लक्ष्य २३.२ षटकांत १ गडी गमावून ८0 धावा करीत पूर्ण केले. कुकने नाबाद ४७ आणि निक कॉम्पटनने नाबाद २२ धावा केल्या. अॅलेक्स हेल्स ११ धावा काढून बाद झाला. कुकने त्याच्या खेळीदरम्यान कसोटी क्रिकेटमधील १0 हजार धावाही पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो इंग्लंडचा पहिला आणि जगातील १२ वा फलंदाज ठरला. त्याआधी श्रीलंकेने त्यांच्या कालच्या ५ बाद ३0९ या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि त्यांचा दुसरा डाव ४७५ धावांत आटोपला.