श्रीलंकेकडून इंग्लंडचा धुव्वा
By admin | Published: November 30, 2014 01:56 AM2014-11-30T01:56:33+5:302014-11-30T01:56:33+5:30
इंग्लंडविरुद्धच्या दुस:या वन-डे सामन्यात 8 विकेटनी मात केली़ या विजयासह लंकेने 7 सामन्यांच्या मालिकेत 2-क् अशी आघाडी मिळविली आह़े
Next
कोलंबो : माहेला जयवर्धने (नाबाद 77) आणि कुमार संगकारा (नाबाद 67) यांच्या आक्रमक अर्धशतकांच्या बळावर श्रीलंकेने इंग्लंडविरुद्धच्या दुस:या वन-डे सामन्यात 8 विकेटनी मात केली़ या विजयासह लंकेने 7 सामन्यांच्या मालिकेत 2-क् अशी आघाडी मिळविली आह़े
श्रीलंकेच्या अजंता मेंडिस याने 33 धावांत इंग्लंडच्या 3 गडय़ांना तंबूचा रस्ता दाखविल्यामुळे पाहुणा संघ 43 षटकांत 185 धावांत गारद झाला़
प्रत्युत्तरात श्रीलंकेने विजयी लक्ष्य
34़2 षटकांत 2 गडय़ांच्या बदल्यात पूर्ण केल़े
लंकेकडून जयवर्धने याने आपल्या खेळीत 93 चेंडूंचा सामना करताना 8 चौकार लगावले, तर संगकाराने 8क् चेंडूंना सामोरे जाताना 8 चौकार आणि 1 षटकार खेचला़ या दोन्ही खेळाडूंनी तिस:या विकेटसाठी 149 धावांची भागीदारी रचली़ त्यामुळे हा संघ 1क़्4 षटके शिल्लक असताना
विजयी ठरला़
मालिकेतील पहिल्या लढतीत लंकेने 25 धावांनी विजय मिळविला होता़
ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिल ह्युजला श्रद्धांजली देण्यासाठी दोन्ही संघांतील खेळाडू दंडावर काळीपट्टी बांधून खेळल़े सामन्याच्या सुरुवातीला एका मिनिटाचे मौनसुद्धा पाळण्यात आल़े तसेच, स्टेडियमवरील ङोंडेसुद्धा अध्र्यावर उतरवण्यात आले होत़े
त्याआधी इंग्लंडकडून रवी बोपारा याने सर्वाधिक 51 धावांचे योगदान दिले, तर जो रूट याने 42 धावांची खेळी केली़ लंकेकडून अजंता मेंडिस याने 3, तर धम्मिका प्रसाद याने 2 बळी मिळविल़े
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची सुरुवात निराशाजनक झाली़ त्यांनी अवघ्या 37 धावांत आपले 2 गडी गमावल़े सलामीवीर फलंदाज तिलकरत्ने दिलशान 26, तर कुशाल परेरा 9 धावा काढून बाद झाला़ यानंतर संगकारा आणि जयवर्धने यांनी लंकेला सहज विजय मिळवून दिला़
त्याआधी खराब वातावरणामुळे सामना 45 षटकांचा करण्यात आला होता़ (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : 43 षटकांत सर्वबाद 185़ (अॅलिस्टर कुक 22, जो रूट 42, रवी बोपारा 51, इयान बेल 11़ अजंता मेंडिस 3/33, तिलकरत्ने दिलशान 2/32, धम्मिका प्रसाद 2/16)़
श्रीलंका : 34़2 षटकांत 2 बाद 186़ (तिलकरत्ने दिलशान 26, कुशाल परेरा 9, संगकारा नाबाद 67, जयवर्धने नाबाद 77़ स्टीव्हन फिन 1/35, मोईन अली 1/38)़