इंग्लंडच्या मुस्लिम खेळाडूंना धोका नाही
By admin | Published: November 4, 2016 04:14 AM2016-11-04T04:14:02+5:302016-11-04T04:14:02+5:30
भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड क्रिकेट संघातील मुस्लिम खेळाडू मोईन अली आणि आदिल रशीद यांच्या सुरक्षेसंबंधी भारतात कोणतेही प्रश्नचिन्ह नाही
नवी दिल्ली : भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड क्रिकेट संघातील मुस्लिम खेळाडू मोईन अली आणि आदिल रशीद यांच्या सुरक्षेसंबंधी भारतात कोणतेही प्रश्नचिन्ह नाही, असे इंग्लंडचे सुरक्षा सल्लागार रेग डिक्सन यांनी सांगितले.
काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमधून इंग्लंडच्या मुस्लिम खेळाडूंच्या सुरक्षिततेवरून विविध चर्चा रंगत होत्या. यावर डिक्सन यांनी स्पष्टीकरण देताना प्रसारमाध्यमांतील चर्चेचे खंडन केले. विशेष म्हणजे, काही प्रसारमाध्यमांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव पाकिस्तानी पंच अलीम दार भारत-इंग्लंड मालिकेत पंचगिरी करण्यास भारतात येणार नसल्याची माहिती दिली होती.
यावर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही (आयसीसी) आपल्या प्रतिक्रियेमध्ये स्पष्ट केले, की ‘भारत-इंग्लंड मालिकेसाठी दार यांना करारबद्ध केले गेले नाही, याचा अर्थ असा होत नाही, की त्यांना सुरक्षिततेच्या कारणामुळे लांब
ठेवले आहे. मात्र, गेल्या वर्षी
झालेल्या भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेतून सुरक्षिततेच्या कारणास्तव माघार घेण्याचा त्यांचा निर्णय व्यावसायिक होता.’’