बांगलादेशविरुद्ध इंग्लंडची स्थिती भक्कम

By Admin | Published: October 23, 2016 03:18 AM2016-10-23T03:18:28+5:302016-10-23T03:18:28+5:30

बेन स्टोक्सच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर शनिवारी इंग्लंडने बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात आपली स्थिती मजबूत केली. शाकिब अल-हसनने ७९ धावांच्या

England's position against Bangladesh is strong | बांगलादेशविरुद्ध इंग्लंडची स्थिती भक्कम

बांगलादेशविरुद्ध इंग्लंडची स्थिती भक्कम

googlenewsNext

चितगाव : बेन स्टोक्सच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर शनिवारी इंग्लंडने बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात आपली स्थिती मजबूत केली. शाकिब अल-हसनने ७९ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेत बांगलादेशचे आव्हान कायम राखले. स्टोक्सच्या ८५ धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने आज, तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ८ बाद २२८ धावांची मजल मारली. त्याआधी, सकाळच्या सत्रात त्याने ३ बळी घेत बांगलाचा डाव २४८मध्ये गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
पाहुणा इंग्लंड संघाकडे एकूण २७३ धावांची आघाडी असून त्यांच्या दोन विकेट शिल्लक आहे. फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर ही चांगली धावसंख्या मानल्या जात आहे. चौथ्या डावात येथे फलंदाजी करणे कठीण आहे.
स्टोक्सने खडतर खेळपट्टीवर १५१ चेंडूंना सामोरे जाताना ६ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ८५ धावांची खेळी केली. त्याला जॉनी बेयरस्टॉची चांगली साथ लाभली. स्टोक्सने बेयरस्टॉसोबत सहाव्या विकेटसाठी १२७ धावांची भागीदारी केली. एकवेळ इंग्लंडचा निम्मा संघ ६२ धावांत तंबूत परतला होता. बेयरस्टॉला वैयक्तिक ४७ धावांवर कमरुल इस्लामने माघारी परतवले. त्यानंतर शाकिबने स्टोक्सला माघारी परतवले. शाकिबने आदिल रशीदला बाद करीत १५ व्यांदा डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याची कामगिरी केली. त्याआधी, कालच्या ५ बाद २२१ धावसंख्येवरुन खेळताना बांगलादेशचा डाव २४८ धावांत संपुष्टात आला. इंग्लंडतर्फे स्टोक्सने २६ धावांच्या मोबदल्यात एकूण ४ बळी घेतले. (वृत्तसंस्था)

Web Title: England's position against Bangladesh is strong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.