इंग्लंडचा ४४४ धावांचा विक्रम,पाकिस्तानचा १६९ धावांनी पराभव
By admin | Published: August 31, 2016 01:48 AM2016-08-31T01:48:10+5:302016-08-31T07:33:01+5:30
पाकिस्तानविरूद्ध तिसर्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने ५0 षटकात ३ बाद ४४४ धावांचा डोंगर उभा करुन विश्वविक्रम नोंदविला
ऑनलाइन लोकमत
टेंटब्रीज, दि. ३१: पाकिस्तानविरूद्ध तिसर्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने ५0 षटकात ३ बाद ४४४ धावांचा डोंगर उभा करुन विश्वविक्रम नोंदविला. या विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ४२.५ षटकात २७५ धावांत गारद झाला. इंग्लंडने हा सामना १६९ धावांनी जिंकला.
विजयासाठी ठेवलेल्या ४४५ धावांच्या अशक्यप्राय आव्हानापुढे पाक संघ पूर्णपणे ढेपाळला. शार्जिलखानने ३0 चेंडूत ५८ धावा फटकावून इंग्लंडच्या गोलंदाजांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. सर्फराज अहमद ३८ व मोहमद नवाजने ३४ धावा केल्या. मोहम्मद आमेरने झटपट अर्धशतक ठोकले. त्यामुळे पाकला अन्य फलंदाजांनी मात्र नांगी टाकली. वोक्सने ४ गडी बाद केले.
लक्षवेधी :
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील इंग्लंडने सर्वाधिक धावसंख्या उभारली. याआधीचा श्रीलंकेने नेदरलँड्सविरुद्ध केलेला ४४३ धावांचा विक्रम इंग्लंडने मागे टाकला.
इंग्लंडने याआधी गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध ४०८ धावा केल्या होत्या.
या सामन्यात इंग्लंडने अखेरच्या १० षटकांत विक्रमी १३५ धावांचा चोप दिला.
एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वांत खराब गोलंदाजीमध्ये वहाब रियाझ दुसऱ्या क्रमांकावर
अॅलेक्स हेल्स इंग्लंडकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक खेळी करणारा फलंदाज ठरला. याआधी हा विक्रम रॉबिन स्मिथच्या (१६७*) नावावर होता.
हेल्स व रुट यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेली २४८ धावांची भागीदारी इंग्लंडची दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम भागीदारी ठरली. अँड्र्यू स्ट्रॉस व ट्रॉट यांनी २०१०मध्ये दुसऱ्या विकेटसाठी २५० धावांची भागीदारी केली आहे.
इंग्लंडच्या ६ फलंदाजांनी सलग पाचव्यांदा ५० किंवा त्याहून अधिक धावांची खेळी केली आहे. यामध्ये रुट, बॉयकट, गुच, स्टेवार्ट, ट्रॉट आणि हेल्स यांचा समावेश आहे.
याआधीच्या शेवटच्या ७ एकदिवसीय सामन्यांतून हेल्सचे हे तिसरे शतक आहे. विशेष म्हणजे, आपल्या याआधीच्या २७ डावांत त्याने केवळ एक शतक झळकावले होते. २१व्या डावात त्याने आपले पहिले शतक झळकावले होते.