इंग्लंडचा हा संघ झाला शून्य धावांमध्ये गारद
By admin | Published: February 12, 2016 01:36 PM2016-02-12T13:36:06+5:302016-02-12T13:36:06+5:30
एक विचित्र विक्रम इंग्लंडमध्ये झाला आहे. एक संघाचे सगळे खेळाडू एकही धाव न करता बाद झाले आहेत.
Next
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. १२ - क्रिकेटविश्वामध्ये कमी धावांमध्ये संपूर्ण बाद होण्याचे, सर्वोच्च धावसंख्या करण्याचे असे अनेक विक्रम होत असतात. परंतु, एक विचित्र विक्रम इंग्लंडमध्ये झाला आहे. एक संघाचे सगळे खेळाडू एकही धाव न करता बाद झाले आहेत.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या केंट रिजनल फायनलमध्ये हा प्रकार घडला. प्रत्येक संघात सहा खेळाडू आणि इनडोअर सामने असं या मालिकेचं स्वरून होतं. ख्राइस्ट चर्च युनिव्हर्सिटी विरुद्ध बापशिल्ड असा सामना होता. ख्राईस्ट चर्चनं १२० धावा केल्या आणि नंतर बापशिल्डचे फलंदाज मैदानात उतरले. परंतु अवघ्या २० चेंडूंमध्ये एकही धाव न करता सगळे फलंदाज बाद झाले आणि ख्राइस्ट चर्चनं हा सामना १२० धावांनी जिंकला.
हा सामना असा झाला, तोदेखील इनडोअर, यावर आमचा अजुनही विश्वास बसत नसल्याची प्रतिक्रिया ख्राइस्ट चर्चचा गोलंदाज माइक रोझ यांनं व्यक्त केली आहे. त्यापुढं जात माइक म्हणला की या २० चेंडूंमध्ये बहुदा मी एकमेव क्षेत्ररक्षक असा होतो की ज्यानं सामन्यादरम्यान चेंडूला स्पर्ष केला. इतर कुणाकडे तर चेंडू गेला पण नाही.
क्रिकेटच्या विश्वात जेव्हा जेव्हा कमी धावसंख्येची चर्चा होईल तेव्हा तेव्हा क्रिकेट रसिकांना बापशिल्डची आठवण नक्कीच होईल.