इंग्लंडचा आॅस्ट्रेलियावर रोमहर्षक विजय
By admin | Published: September 1, 2015 12:04 AM2015-09-01T00:04:49+5:302015-09-01T00:04:49+5:30
अत्यंत रोमहर्षक झालेल्या टी-टष्ट्वेन्टी सामन्यात इंग्लंडने आॅस्ट्रेलियावर ५ धावांनी विजय मिळविला. मोईन अली (नाबाद ७२) व इयान मॉर्गन (७४) यांच्या आक्रमक खेळीच्या बळावर
कार्डीफ : अत्यंत रोमहर्षक झालेल्या टी-टष्ट्वेन्टी सामन्यात इंग्लंडने आॅस्ट्रेलियावर ५ धावांनी विजय मिळविला. मोईन अली (नाबाद ७२) व इयान मॉर्गन (७४) यांच्या आक्रमक खेळीच्या बळावर इंग्लंडने १८२ धावांचा डोंगर उभारला. या आव्हानाला आॅस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथने ५३ चेंडूत केलेली ९० धावांची जिगरबाज खेळी करीत जोरदार प्रत्युत्तर दिले. मात्र त्याची खेळी संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली.
कार्डिफ येथील सोफिया गार्डन्स येथे हा सामना झाला. नाणेफेक जिंकून आॅस्ट्रेलियाने गोलंदाजी स्वीकारली. इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या १८३ धावांचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (४) व शेन वॉट्सन (८) किरकोळीत बाद झाले. त्यानंतर स्टीव्हन स्मिथ (५३ चेंडूत ९० धावा) व ग्लेन मॅक्सवेल (३२ चेंडूत ४४ धावा) यांनी सामन्यात रंगत भरली. स्टेक्सने मॅक्सवेलला १४ व्या षटकांत बाद केले. तर ९ चेंडू शिल्लक असताना स्मिथ विलीच्या गोलंदाजीवर बिलिंग्जकडे झेल देऊन परतला. त्यानंतर सामन्याचे चित्र पालटले. विली याने २, तर फिन, टॉप्ले, स्टोक्स व अली यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
तत्पूर्वी जेजे रॉय (११), एडी हेल्स (३) या सलामवीरांना लवकर गमावल्यानंतर अली (७६ चेंडूत नाबाद ७२) व मॉर्गन (३९ चेंडूत ७२ धावा) यांच्या खेळीने इंग्लंडने २० षटकांत ५ गडी गमावून १८२ धावा उभारल्या. पॅट कमिन्सने २, तर नॅथन कोल्टर-निल, मिचेल स्टार्क यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. (वृत्तसंस्था)