भारताकडून इंग्लंडचा धुव्वा

By admin | Published: February 3, 2017 05:02 AM2017-02-03T05:02:23+5:302017-02-03T05:02:23+5:30

सुखम माझी (नाबाद ६७), गणेश मुंडकर (नाबाद ७८) यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारतीय दृष्टिहीन संघाने अंधांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंड

England's wash away from India | भारताकडून इंग्लंडचा धुव्वा

भारताकडून इंग्लंडचा धुव्वा

Next

नवी दिल्ली : सुखम माझी (नाबाद ६७), गणेश मुंडकर (नाबाद ७८) यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारतीय दृष्टिहीन संघाने अंधांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंड संघाचा १० गडी राखून पराभव केला.
इंदूर येथील होळकर मैदानावर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा खेळताना इंग्लंड संघाचा डाव १९.४ षटकांत १५८ धावांवर संपुष्टात आला. यात जस्टिन हॉलिंग्सवर्थ (२४), नॅथनील फॉय (७), लुक सुज (१६), एडवर्ड होसेल (५७), डॅनियल फिल्ड नाबाद (११) यांनी धावा केल्या. भारताकडून केतन पटेल (२-४०), वेंकटेश राव (१-२०), सुनील (१-१२), सोनू गोलकर (१-१७), इक्बाल जाफर (१-१०) यांनी सुरेख गोलंदाजी करून विजयाचा पाया रचला. या लढतीसाठी मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन आॅफ ब्लाइंड
(वृत्तसंस्था)

- भारत संघाने हे आव्हान ११ षटकांत एकही गडी न गमावता १५९ धावा काढून पूर्ण केले. यात सुखम माझीने ३२ चेंडंूत १२ चौकारांच्या मदतीने नाबाद ६७ धावा व गणेश मुदाकरने ३४ चेंडंूत १५ चौकारांच्या साह्याने नाबाद ७८ धावा करून संघाला विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड : १९.४ षटकांत सर्व बाद १५८ धावा (जस्टिन हॉलिंग्सवर्थ २४ (१७ चेंडू, ३ चौकार), नॅथनील फॉय ७ (६ चेंडू), लुक सुज १६ (१८ चेंडू), एडवर्ड होसेल ५७ (३४ चेंडू, ७ चौकार), डॅनियल फिल्ड नाबाद ११ (१२ चेंडू), केतन पटेल २-४०, वेंकटेश राव १-२०, सुनील १-१२, सोनू गोलकर १-१७, इक्बाल जाफर १-१०) पराभूत वि. भारत : ११ षटकांत बिनबाद १५९धावा (सुखम माझी नाबाद ६७ (३२ चेंडू, १२ चौकार), गणेश मुंडकर नाबाद ७८ (३४ चेंडू, १५ चौकार).

भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्यासाठी इंदौरमधील सुमारे २५ हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. यामध्ये ७५ ते ८०% प्रेक्षक हे महाविद्यालयीन युवक व युवती होत्या. या सामन्याकडे फक्त मनोरंजन म्हणून नाही तर शिक्षण आणि साहस या दृष्टिने पाहिला. यातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी मला येवून विचारले की, हे अंध क्रिकेट कसे खेळतात. मग मी त्यांना सीस्याचे लहान गोळे असलेला चेंडू दाखविला आणि या अंध क्रिकेटसंबंधी थोडी माहिती व नियम सांगितले. हे ऐकून त्यांना नवल वाटले, की बीसीसीआयचे क्रिकेट आणि या क्रिकेटमध्ये खूप फरक आहे. तेथे आपण फक्त सामन्याचा आनंद लुटतो, पण या दृष्टिहीन खेळाडूंकडून खूप काही शिकण्यासारखेसुद्धा आहे. असे विचार त्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडे मांडले.
- डॉ. अनिल भंडारी, अध्यक्ष, मध्य प्रदेश क्रिकेट
असोसिएशन फॉर ब्लाइंड.

Web Title: England's wash away from India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.