मुंबई मॅरेथॉनमध्ये इथोपियन धावपटूंचे वर्चस्व, भारतीय गटात सुधा सिंगची बाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 02:05 PM2020-01-19T14:05:55+5:302020-01-19T14:07:11+5:30
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदाही इथोपियन धावपटूंचे वर्चस्व पाहायला मिळाले.
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदाही इथोपियन धावपटूंचे वर्चस्व पाहायला मिळाले. आज पहाटे ५.१५ वाजल्यापासून या मॅरेथॉनला उत्साहात सुरुवात झाली. पुरुष गटात पहिले तीनही क्रमांक इथोपियन धावपटूंनी पटकावली, तर महिला विभागात दुसरा क्रमांक वगळता पहिल्या व तिसऱ्या क्रमांकावर इथोपियन धावपटूच राहिले.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून या मॅरेथॉनला सुरुवात झाली. मुंबई मॅरेथॉनचे यंदाचे हे १७वे वर्ष असून, या प्रतिष्ठेच्या मॅरेथॉनमध्ये सुमारे ५५, ३२२ धावपटूंनी सहभाग निश्चित केला होता. यामध्ये ९,६६० मुख्य मॅरेथॉन आणि १५ हजार २६० धावपटू अर्धमॅरेथॉनमध्ये सहभागी होती. त्याचप्रमाणे, खुली १०किमी रन (८,०३२), ड्रीम रन (१९,७०७), वरिष्ठ नागरिक रन (१,०२२), दिव्यांग (१,५९६) व पोलीस कप (४५ संघ) अशा इतर गटांमध्येही सहभागी झाले होते.
एकूण ४ लाख २० हजार यूएस डॉलर किंमतीची बक्षिस रक्कम असलेल्या या मॅरेथॉनमध्ये मुख्य स्पर्धेतील पहिल्या तीन धावपटूंना अनुक्रमे ४५ हजार, २५ हजार आणि १७ हजार डॉलरचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात येतील. अव्वल तीन भारतीय धावपटूंना अनुक्रमे ५, ४, व ३ लाख रुपयांचे बक्षिस देण्यात आले.
निकाल
महिला विभाग ( पूर्ण मॅरेथॉन एलिट गट)
अॅमेन बेरीसो 2 तास 24 मिनिटे 51 सेकंद ( इथोपिया)
रोदाह जेपकोरीर 2 तास 27 मिनिटे 14 सेकंद ( केनिया)
हॅव्हन हैलू 2 तास 28 मिनिटे 56 सेकंद ( इथोपिया)
पुरूष विभाग ( पूर्ण मॅरेथॉन एलिट गट)
डॅरेरा हुरीसा 2 तास 08 मिनिटे 09 सेकंद ( इथोपिया)
आयेले अॅबशेरो 2 तास 08 मिनिटे 20 सेकंद ( इथोपिया)
बिर्हानू तेशोमे 2 तास 08 मिनिटे 26 सेकंद ( इथोपिया)
पूर्ण मॅरेथॉन ( पुरुष गट भारतीय)
श्रीतू बुगाथा 2 तास 18 मिनिटे 44 सेकंद
शेर सिंग 2 तास 24 मिनिटे
दुर्गा बहादूर बुधा 2 तास 24 मिनिटे 03 सेकंद
पूर्ण मॅरेथॉन ( महिला गट भारतीय )
सुधा सिंग 2 तास 45 मिनिटे 30 सेकंद
ज्योती गवते 2 तास 49 मिनिटे 14 सेकंद
श्यामली सिंग 2 तास 58 मिनिटे 44 सेकंद
अर्ध मॅरेथॉन ( महिला विभाग)
पारूल चौधरी 1 तास 15 मिनिटे 37 सेकंद
आरती पाटील 1 तास 18 मिनिटे 03 सेकंद
मोनिका आथरे 1 तास 18 मिनिटे 33 सेकंद
अर्ध मॅरेथॉन ( पुरूष विभाग)
तिर्था पून १ तास ०५ मिनिटे ३९ सेकंद
मान सिंग १ तास ०६ मिनिटे ०६ सेकंद
बलिअप्पा एबी १ तास 0७ मिनटे ११ सेकंद