युरो चषक फुटबॉल : युक्रेनचा उडवला ४-० असा धुव्वा, केनचा धडाका; इंग्लंड उपांत्य फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 09:07 AM2021-07-05T09:07:40+5:302021-07-05T09:07:58+5:30

रोम : कामगिरीत सातत्य न राखता आल्याने टीकेला सामोरे जात असलेल्या हॅरी केनने अखेर आपला जलवा दाखवला. त्याने केलेल्या ...

Euro Cup football: Ukraine beat 4-0, England in the semi-finals | युरो चषक फुटबॉल : युक्रेनचा उडवला ४-० असा धुव्वा, केनचा धडाका; इंग्लंड उपांत्य फेरीत

युरो चषक फुटबॉल : युक्रेनचा उडवला ४-० असा धुव्वा, केनचा धडाका; इंग्लंड उपांत्य फेरीत

googlenewsNext

रोम : कामगिरीत सातत्य न राखता आल्याने टीकेला सामोरे जात असलेल्या हॅरी केनने अखेर आपला जलवा दाखवला. त्याने केलेल्या दोन शानदार गोलच्या जोरावर इंग्लंडने युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारताना युक्रेनचा ४-० असा धुव्वा उडवला. (Euro Cup football: Ukraine beat 4-0, England in the semi-finals)

यंदाच्या युरोमध्ये पहिल्यांदाच इंग्लंडचा सामना वेम्बले स्टेडियमच्या बाहेर झाला. रोम येथील स्टेडिओ ऑलिम्पिकोमध्ये झालेल्या या सामन्यात इंग्लंडने एकहाती वर्चस्व राखले. सामन्याला सुरुवात झाल्यानंतर चौथ्याच मिनिटाला गोल करत केनने इंग्लंडला आघाडीवर नेले. यानंतर हॅरी मॅग्युअर याने ४६ व्या मिनिटाला गोल केल्यानंतर केनने ५०व्या मिनिटाला पुन्हा एक गोल करत इंग्लंडची आघाडी ३-० अशी भक्कम केली. युक्रेनने दुसऱ्या सत्रात पुनरागमनाचा प्रयत्न केला, मात्र इंग्लंडचा भक्कम बचाव भेदण्यात त्यांना यश आले नाही. जॉर्डन हेंडरसन याने ६३व्या मिनिटाला इंग्लंडचा चौथ्या गोल करत संघाचा विजय निश्चित केला. विशेष म्हणजे इंग्लंडने सलग पाचव्या सामन्यात आपल्या प्रतिस्पर्धी संघाला गोल करण्यापासून रोखले आहे. 

१९६६ सालानंतर पहिल्यांदाच इंग्लंडने मोठ्या स्पर्धेतील बाद फेरीत खेळताना चार गोल करण्याची कामगिरी केली आहे. १९६६ सालच्या विश्वचषक अंतिम सामन्यात इंग्लंडने जर्मनीला ४-२ असे नमवले होते. इंग्लंड संघ आता पुन्हा लंडनला परतणार असून, बुधवारी त्यांचा सामना डेन्मार्कविरुद्ध होईल. डेन्मार्कने बाकू येथे झालेल्या सामन्यात झेक प्रजासत्ताकला २-१ असे नमवले  होते.

Web Title: Euro Cup football: Ukraine beat 4-0, England in the semi-finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.