युरो कप : फ्रान्सचा बदला घेण्यास आयर्लंड सज्ज
By admin | Published: June 25, 2016 06:44 PM2016-06-25T18:44:15+5:302016-06-25T18:44:15+5:30
आयर्लंड आणि फ्रान्स दोन्ही संघ थियरे आॅनरीच्या बहुचर्चित हँडबॉलवाल्या घटनेला मागे टाकून रविवारी येथे होणाºया युरो चषक २0१६ च्या सुपर-16 राउंडमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत.
Next
>लियोन : आयर्लंड आणि फ्रान्स दोन्ही संघ थियरे आॅनरीच्या बहुचर्चित हँडबॉलवाल्या घटनेला मागे टाकून रविवारी येथे होणाºया युरो चषक २0१६ च्या सुपर-16 राउंडमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत. होम क्राउडचा दबाव झुगारुन आपला संघ या सामन्यात विजय नोंदवेल अशी अपेक्षा आयरिश प्रेक्षकांनी व्यक्त केली.
या दोन्ही संघादरम्यान १८ नोव्हेंबर २00९ रोजी झालेल्या सामन्यात शेवटच्या क्षणात आॅनरीने विलियम गलासच्या गोलला मदत करताना चेंडूवर नियंत्रण मिळवताना दोन वेळा आपल्या हाताचा उपयोग केला होता. या घटनेला ली हँड आॅफ गॉड असे संबोधण्यात आले. या सामन्यात फ्रान्सने २-१ ने विजय मिळवला होता. सध्याच्या दोन्ही संघातील काही खेळाडू या सामन्याचे साक्षिदार आहेत. परंतु या घटनेचा उद्याच्या सामन्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे दोन्ही संघातील खेळाडूंना वाटते. फ्रान्सचे सहाय्यक कोच गई स्टीफन म्हणाले की, ती जुनी घटना आहे. त्याचा या सामन्यावर कोणताच परिणाम होणार नाही.