युरो चषक - पोर्तुगाल अंतिम फेरीत

By admin | Published: July 7, 2016 02:16 AM2016-07-07T02:16:18+5:302016-07-07T04:49:24+5:30

पोर्तुगाल आणि वेल्स यांच्यातील युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोर्तुगालने विजय मिळविला. या सामन्यात पोर्तुगालने वेल्सवर २-० अशी मात केली.

Euro Cup - Portugal in the final round | युरो चषक - पोर्तुगाल अंतिम फेरीत

युरो चषक - पोर्तुगाल अंतिम फेरीत

Next
>लेयॉन (फ्रान्स) : बलाढ्य पोर्तुगालने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत नवख्या वेल्सला २-० असे पराभूत करत युरो चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडाक्यात प्रवेश केला. पोर्तुगालकडून रोनाल्डो व नानीने प्रत्येकी एक गोल केला. स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच उपांत्य फेरीत पोहचलेल्या वेल्सने पोर्तुगालला कडवी टक्कर दिली मात्र स्टार खेळाडू रोनाल्डोच्या नेतृत्वाखालील पोर्तुगालला पराभूत करण्यात ते अपयशी ठरले. अंतिम सामन्यात पोर्तुगालची लढत आज होणाऱ्या जर्मनी विरुद्ध फ्रान्स सामन्यातील विजेत्याशी होईल.
वेल्सने संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली होती.त्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र सामन्याच्या सुरुवातीपासूनच पोर्तुगालने आपल्या अनुभवाच्या जोरावर सामन्यावर पकड ठेवली. वेल्सचा स्टार खेळाडू गेरार्थ बेल व अ‍ॅशले विल्यम्स यांनी सातत्याने पोर्तुगालवर वर्चस्व मिळवण्यासाठी गोलपोस्टवर धडका मारल्या. मात्र पोर्तुगालच्या संरक्षक फळीने त्यांचे प्रयत्न उधळून लावले. पोर्तुगालच्या बाजूने नवख्या रॅनेटो सँचेस व अनुभवी रोनाल्डो यांनीही आक्रमण केले. मात्र पोर्तुगालने गोल करण्याच्या तिनही संधी दवडल्या.त्यामुळे पुर्वार्ध गोलशून्य बरोबरीतच राहिला. 
उत्तरार्धात मात्र पोर्तुगालने आक्रमक पावित्रा घेतला. सामन्याच्या ५० व्या मिनिटाला मिळालेल्या कॉर्नरवर रोनाल्डोने अप्रतिम हेडरद्वारे गोल करत संघाला १- ० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलनंतर पोर्तुगालच्या समर्थकांनी एकच जल्लाष केला. पाठोपाठ ५३ व्या मिनिटाला रोनाल्डोने दिलेल्या पासचे सोने करत नानीने चेंडू गोलपोस्टमध्ये धाडला.या गोलनंतर २-० अशी पिछाडी झाल्याने वेल्सचा संघ हडबडून गेला. त्यांनी गोल फेडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र पोर्तुगालचा गोलरक्षक रुई पॅट्रीसियो व बचावफळीने त्यांचे प्रयत्न उधळून लावले. पूर्ण वेळेत सामन्यात २-० अशी आघाडी कायम राहिली.
 
रोनाल्डोची विक्रमाशी बरोबरी
युरो चषक स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याच्या विक्रमाशी रोनाल्डोने बरोबरी केली. फ्रान्सचा मायकल प्लॅटिनी याने १९८४ मध्ये या स्पर्धेत पाच सामन्यात ९ गोल केले होते. रोनाल्डोने २० सामन्यात ९ गोल करत या विक्रमाशी बरोबरी केली.
 
 

Web Title: Euro Cup - Portugal in the final round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.