युरो चषकातल्या उपांत्यपूर्व फेरीत पोलंड —पोर्तुगाल लढत बरोबरीत
By admin | Published: July 1, 2016 02:34 AM2016-07-01T02:34:49+5:302016-07-01T02:34:49+5:30
युरो चषक फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी रात्री उशिरा खेळल्या गेलेला पोलंड व पोर्तुगाल संघातील उपउपांत्य फेरीचा सामना निर्धारित वेळेत १—१ असा अनिर्णित राहिला.
ऑनलाइन लोकमत
मार्सिली, दि. 01- युरो चषक फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी रात्री उशिरा खेळल्या गेलेला पोलंड व पोर्तुगाल संघातील उपउपांत्य फेरीचा सामना निर्धारित वेळेत १—१ असा अनिर्णित राहिला.
या सामन्याची सुरुवात सनसनाटी झाली. दुसर्या मिनिटाला पोलंडच्या कॅमील ग्रोसीस्कीने चेंडूवर ताबा मिळवत डाव्या बाजूने थेट पोर्तुगालच्या गोलक्षेत्रात धडक दिली. त्याने रॉबर्ट लेवेन्स्कीला सुरेख पास दिला. या पासवर लेवेन्स्कीने चेंडू अचूक जाळ्यात ढकलून संघाला आघाडी मिळवून दिली. ३३व्या मिनिटाला पोर्तुगालच्या रिनॅटो सांचेजने नानीच्या पासवर गोल नोंदवून संघाला १—१ अशी बरोबरी साधून दिली. ४४व्या मिनिटाला पोलंडच्या जे. आर्टरला पंचांनी यलो कार्ड दाखवले. यामुळे त्याला पुढील सामन्यात खेळता येणार नाही.
मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ १—१ असे बरोबरीत होते. ६५व्या मिनिटाला पोलंडच्या कॅमिल ग्लिकचा चुकीच्या पद्धतीने प्रतिस्पर्धी खेळाडूला रोखण्याचा प्रयत्न केल्याने पंचांनी त्याला यलो कार्ड दाखविले. उत्तरार्धात दोन्ही संघ गोल न करू शकल्याने सामना निर्धारित वेळेत १—१ असा बरोबरीत राहीला.