अखेर अजिंक्य रहाणेचा टी-२० विश्वचषकाच्या संघात समावेश

By Admin | Published: February 5, 2016 01:45 PM2016-02-05T13:45:19+5:302016-02-05T14:19:51+5:30

आशिया कप आणि टी-२० वर्ल्ड कपसाठी अखेर भारतीय संघ जाहीर झाला असून अजिंक्य रहाणेची निवड झाली आहे

Eventually, Ajinkya Rahane is included in the T20 World Cup squad | अखेर अजिंक्य रहाणेचा टी-२० विश्वचषकाच्या संघात समावेश

अखेर अजिंक्य रहाणेचा टी-२० विश्वचषकाच्या संघात समावेश

googlenewsNext
>
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - आशिया कप आणि टी-२० वर्ल्ड कपसाठी अखेर भारतीय संघ जाहीर झाला असून अजिंक्य रहाणेची निवड झाली आहे. रहाणेला संधी मिळते की ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणा-या मनिष पांडेला संधी मिळते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या रहाणेला संधी मिळाली आहे. त्याचबरोबर युवराज सिंगलाही कायम ठेवण्यात आलं आहे.
आशिया कप व टी - २० वर्ल्ड कप दोन्हीसाठी महेंद्रसिंह धोनीच कर्णधार असेल हे स्पष्ट करण्यात आलं आहे. संदीप यांच्या अध्यक्षतेखाली निवडसमितीच्या बैठकीत टीम निश्चित करण्यात आली असून भारतीय संघ पुढीलप्रमाणे:
 
महेंद्र सिंह धोनी (कप्तान), रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज, अजिंक्य रहाणे, रवींद्र जाडेजा, हार्दिक पंड्या, अश्विन, हरभजन सिंग, बुमराह, आशिष नेहरा, पवन नेगी आणि मोहम्मद शामी.
 
संघातील खेळाडूंची कामगिरी पुढीलप्रमाणे:
 
महेंद्रसिंह धोनी - ५५ सामने, ८९९ धावा, सरासरी ३३.२९, सर्वोत्तम ४८, शतकं / अर्धशतकं - ० / ०
रोहित शर्मा - ४७ सामने, १०१० धावा, सरासरी ३४.८२, सर्वोत्तम १०६, शतकं / अर्धशतकं - १ / ९
शिखर धवन - ११ सामने, १८८ धावा, सरासरी १७.०९, सर्वोत्तम ४२, शतकं / अर्धशतकं - ० / ०
विराट कोहली - ३३ सामने, १२५१ धावा, सरासरी ५०. ६२, सर्वोत्तम ९०, शतकं / अर्धशतकं - ० / १
सुरेश रैना - ४९ सामने, १०७३ धावा, सरासरी ३३.५३, सर्वोत्तम १०१, शतकं / अर्धशतकं - १ / ३
युवराज सिंग - ४३ सामने, ९८३ धावा, सरासरी ३१.७०, सर्वोत्तम ७७, शतकं / अर्धशतकं - ० / ८
अजिंक्य रहाणे - १३ सामने, २७३ धावा, सरासरी २१, सर्वोत्तम ६१, शतकं / अर्धशतकं - ० / १
रवींद्र जाडेजा - २५ सामने, ८४ धावा, सरासरी ९.३३, सर्वोत्तम २५, शतकं / अर्धशतकं - ० / ०
गोलंदाजीमध्ये प्रति षटक ७.३५ धावा देत १९ गडी बाद
हार्दिक पंड्या - गोलंदाजीमध्ये ३ सामन्यात प्रति षटक ११.१४ धावा देत ३ गडी बाद.
आर अश्विन - गोलंदाजीमध्ये ३१ सामन्यांत प्रति षटक ७.२७  धावा देत ३३ गडी बाद.
हरभजन सिंह - गोलंदाजीमध्ये २७ सामन्यांत प्रति षटक ६.३४ धावा देत २४ गडी बाद.
जसप्रीत बुमराह - गोलंदाजीमध्ये ३ सामन्यांत प्रति षटक ८.९५ धावा देत ६ गडी बाद.
आशिष नेहरा - गोलंदाजीमध्ये ११ सामन्यांत प्रति षटक ८.६० धावा देत १५ गडी बाद.
मोहम्मद शामी - गोलंदाजीमध्ये ४ सामन्यांत प्रति षटक ८.९२ धावा देत ५ गडी बाद.
पवन नेगी - अद्याप आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.

Web Title: Eventually, Ajinkya Rahane is included in the T20 World Cup squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.