अखेर आनंदला द्वितीय स्थानाचे समाधान

By admin | Published: June 27, 2015 12:52 AM2015-06-27T00:52:10+5:302015-06-27T00:52:10+5:30

भारताचा हुकमी खेळाडू आणि पाच वेळचा जागतिक विजेता विश्वनाथन आनंद याला अखेर नॉर्वे बुध्दिबळ स्पर्धेत द्वितीय स्थानावर समाधान मानावे

Eventually, Anand settled for second place | अखेर आनंदला द्वितीय स्थानाचे समाधान

अखेर आनंदला द्वितीय स्थानाचे समाधान

Next

स्टैवैंगकर : भारताचा हुकमी खेळाडू आणि पाच वेळचा जागतिक विजेता विश्वनाथन आनंद याला अखेर नॉर्वे बुध्दिबळ स्पर्धेत द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले. विजेतेपदासाठी अखेरच्या लढतीत बल्गेरीयाच्या वेसेलिन टोपालोव विरुध्द विजय आवश्यक असलेल्या आनंदला बरोबरी मान्य करावी लागल्याने तो द्वितीय स्थानी राहिला.
स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात ज्याप्रकारे उत्कंठापुर्वक सामन्यांचा अंदाज बांधला गेला होता त्याप्रमाणे सामना रंगला नसल्याने निराशा झाली. टोपालोवने सफेद मोहऱ्यांनी खेळताना देखील बचावात्मक पवित्रा घेत कोणताही धोका पत्करला नाही. विजेतेपद निश्चित करण्यासाठी त्याला बरोबरी पुरेशी असल्यानेच त्याने अत्यंत सावधपणे खेळ केला. यानंतर दोघांनीही केवळ १८ चालींच्या खेळानंतर बरोबरी मान्य केले. (वृत्तसंस्था)

Web Title: Eventually, Anand settled for second place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.