राठोड दाम्पत्याकडून एव्हरेस्ट सर पोलिस दलातून कौतुकाचा वर्षाव : दुसर्‍या प्रयत्नात केली ध्येय पूर्ती

By admin | Published: June 8, 2016 01:50 AM2016-06-08T01:50:35+5:302016-06-08T01:50:35+5:30

Everest Chief Police Officer raptured by Rathore couple: Purpose of second attempt | राठोड दाम्पत्याकडून एव्हरेस्ट सर पोलिस दलातून कौतुकाचा वर्षाव : दुसर्‍या प्रयत्नात केली ध्येय पूर्ती

राठोड दाम्पत्याकडून एव्हरेस्ट सर पोलिस दलातून कौतुकाचा वर्षाव : दुसर्‍या प्रयत्नात केली ध्येय पूर्ती

Next
>
पुणे : जगातील सर्वोच्च माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याची अभिमानास्पद कामगिरी शहर पोलिस दलातील दाम्पत्याने केली आहे. त्यामुळे शहर पोलीसदलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात तारकेश्वरी भालेराव -राठोड (३०) व दिनेश टी. राठोड (३०) हे कार्यरत आहेत. ते सन २००६ साली शहर पोलिस दलात रूजु झाले. तारकेश्वरी या राष्ट्रीय फुटबॉलपटू असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कराटेपटू देखील आहे. तर दिनेश हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कराटे व किकबॉक्सिंगपटू आहेत. या दोघांचा २००८ साली प्रेमविवाह झाला. आपल्या एव्हरेस्टच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला. शिखर सर केल्याने स्वप्नपूर्ती झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या दाम्पत्याचा हा दुसरा प्रयत्न असून, गेल्या वर्षी एव्हरेस्टवर झालेल्या हिमस्खलनामुळे त्यांना आपला प्रयत्न अर्ध्यावर सोडून द्यावा लागला होता. या वर्षी देखील या दाम्पत्याने पोलीसखात्यातून परवानगी घेऊन ध्येयपूर्तीसाठी एव्हरेस्टवर चढाईचा निर्णय घेतला. हे दाम्पत्य ३० एप्रिलला बेसकॅम्पजवळ पोहचले. तब्बल २३ दिवस दिवस चाललेल्या या मोहिमेची २३ मे रोजी सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी यशस्वी सांगता झाली.
या विषयी लोकमतला माहिती देताना दिनेश राठोड म्हणाले, अखेरच्या टप्प्यात २१ मे रोजी वातावरण अचानक खराब झाले. सायंकाळी सानंतर रात्री एक ते २ पर्यंत जोरदार वारे वाहत होते. बर्फवृष्टी देखील झाली. मात्र हे बर्फाच्या टणक गोळ्यांचा मारा व्हावा, अशी ही बर्फवृष्टी होती. हवामान विभागाने २३ तारखेनंतर वातावरण आणखी खराब होण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे त्या पूर्वीच पोहचणे गरजेचे होते. त्यामुळे २२ मे रोजी सकाळी सहा वाजता कॅम्प३ पासून वाजता चालण्यास सुरूवात केली. साधारण सकाळी साडेअकरा वाजता कॅम्प फोर पर्यंत पोहोचलो. त्यानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत विश्रांती केली. या नंतर अखेरच्या टप्प्याची चढाई पूर्ण करण्यासाठी प्रयाण केले. अखेर सकाळी सहा वाजून २५ मिनिटांनी एव्हरेस्टवर पाऊल ठेवले.
या नंतर दोन दिवसांनी बेस कॅम्पला पोहोचलो. एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर लोहत्से शिखर सर करण्याचा विचार होता. त्या साठी दोन दिवस वाट पाहिली. मात्र खराब हवामानामुळे हा विचार सोडावा लागला. एव्हरेस्ट शिखर सर केल्याने नेपाळमधील भारताच्या दूतावासाने आमचा सत्कार करायचे ठरविले आहे. बुधवारी (दि. ८) सकाळी साडेअकरा वाजता हा कार्यक्रम आहे. त्यानंतर तीन ते चार दिवसांत पुण्यात पहोचणार असल्याचे राठोड यांनी सांगितले.
काही दिवसापूर्वी औरंगाबाद ग्रामीण पोलिस दलातील कर्मचारी रफीक शेख यांनी एव्हरेस्ट शिखर सर करून पोलिस दलातून पहिल्यांदा एव्हरेस्ट सर करण्याचा मान मिळविला होता. मात्र, राठोड दाम्पत्य हे एव्हरेस्टवर जाणारे पहिले जोडपे ठरले आहे. या मोहिमेत त्यांना शेर्पा फुरशंभा व फरवा यांनी साथ दिली.

------------


गिर्यारोहकांचा धक्कादायक मृत्यू

बेस कॅम्पवर असताना कोलकाता पोलिस दलातील गोतम घोष हा गिर्यारोहक आपणहून भेटीला आला होता. गिर्यारोहण करताना काय काळजी घ्यायची याचे त्याने आम्हाला मार्गदर्शन केले. मात्र २१ मेच्या रात्री घोष यांच्यासह त्यांच्या दोघा पुरूष गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याचे कळले. तसेच त्यांच्या बरोबरील सरीता हाजरा या महिला गिर्यारोहकाला हिमदंश झाल्याने हाताची बोटे गमवावी लागली. तसेच दोन्ही पायांना देखील गंभीर दुखापत झाल्याचे समजले. ज्या व्यक्तीने बेसकॅम्पवर असताना आम्हाला स्वत:हून मार्गदर्शन केले, त्याचा व्यक्ती झालेला मृत्यू धक्कादायक होता.
-----------------

शहर पोलिस दलातील दाम्पत्याने एव्हरेस्ट सर केले ही अभिमानाची गोष्ट आहे.
पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला
-----------------

या दाम्पत्याची गगनभरारीही

साहसाची आवड असलेल्या राठोड दाम्पत्याने या पूर्वी २०१२-१३ साली बारामतीत विमानातून ५ हजार फूटांवरून पॅराग्लायडिंग केले होते. तर २०१४ साली ऑस्ट्रेलियातील १० शिखरे ८ दिवसांत सर केली होती. ही सर्व शिखरे सरासरी २८०० मीटर उंचीची होती. तसेच त्या वेळी देखील १४ हजार फूटांवरून स्कायडायव्हींग केल्याचे दिनेश राठोड यांनी सांगितले.



Web Title: Everest Chief Police Officer raptured by Rathore couple: Purpose of second attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.