स्पॉट फिक्सिंग प्रकरणात शारजील, लतिफ यांच्याविरुद्ध सबळ पुरावे- पीसीबी
By admin | Published: May 9, 2017 09:34 PM2017-05-09T21:34:13+5:302017-05-09T21:34:13+5:30
फलंदाज शारजील खान आणि खालिद लतिफ यांच्याविरुद्ध सबळ पुरावे असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे विधी सल्लागार तफज्जुल रिज्वी यांनी म्हटले
ऑनलाइन लोकमत
कराची, दि. 9 - स्पॉट फिक्सिंग व अन्य प्रकरणात पाकिस्तानचा फलंदाज शारजील खान आणि खालिद लतिफ यांच्याविरुद्ध सबळ पुरावे असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे विधी सल्लागार तफज्जुल रिज्वी यांनी म्हटले आहे. रिज्वी म्हणाले, दूरध्वनीवरील संभाषण, एसएमएस आदींच्या स्वरूपात उपलब्ध पुराव्यांची फोरेन्सिक चाचणी झाली असून खेळाडूंविरुद्ध कारवाई आणि स्पॉट फिक्सिंग आरोपांच्या सुनावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या लवादापुढे सर्वकाही सिद्ध करण्यासाठी हे पुरावे पुरेसे आहेत. रिज्वी यांच्या मते दोन्ही खेळाडू लवादाला चुकीची माहिती देत आहेत. दोन्ही खेळाडूंच्या वकिलांनी सांगितले की, पीसीबीकडे आमच्या पक्षकारांच्याविरुद्ध पुरेसे पुरावे नाहीत, पण रिज्वी यांनी या क्रिकेटपटूंविरुद्ध पुरेसे पुरावे असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पीसीबीच्या भ्रष्टाचारविरोधी समितीने अष्टपैलू मोहम्मद नवाजला 11 मे रोजी चौकशीसाठी बोलविले आहे.