‘या पदकामुळे दृष्टीकोन बदलेल!’ शीतकालीन खेळाबाबत शासकीय उदासीनता बदलेल अशी अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 11:50 PM2018-01-10T23:50:22+5:302018-01-10T23:50:30+5:30
स्किर्इंग प्रकारात आंतरराष्ट्रीय पदक विजेती आंचल ठाकूर हिने माझ्या पदकामुळे शीतकालीन खेळाकडे पाहण्याची शासकीय उदासिनता बदलेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
नवी दिल्ली : स्किर्इंग प्रकारात आंतरराष्ट्रीय पदक विजेती आंचल ठाकूर हिने माझ्या पदकामुळे शीतकालीन खेळाकडे पाहण्याची शासकीय उदासिनता बदलेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
आंचलवर चौफेर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यामुळे भारावलेली आंचल म्हणाली,‘पंतप्रधान माझ्यासाठी टिष्ट्वट करतील, असा स्वप्नातही विचार केला नव्हता. माझे यश कल्पनेपलीकडचे आहे. आम्हाला देखील अन्य खेळांतील खेळाडूंसारखी वागणूक मिळेल. आतापर्यंत सरकारकडून कुठलीही मदत मिळत नव्हती. आम्ही झुंज देत असून कठोर मेहनत घेत आहोत.’ चंदीगडच्या डीएव्ही कॉलेजची विद्यार्थिनी आंचलसाठी हा प्रवास सोपा नव्हता. तिचे वडील रोशन ठाकूर हे भारतीय शीतकालीन क्रीडा महासंघाचे महासचिव आहेत. त्यांची दोन्ही मुले आंचल आणि हिमांशु बालपणापासून या खेळात आहेत. आंचल पुढे म्हणाली,‘मी सातवीपासूनच युरोपात स्किर्इंग करते. मी या खेळात पुढे जावे यासाठी कुठलाही आधार नसताना आम्हा दोघांवर त्यांनी भरपूर खर्च केला. भारतात वर्षभर बर्फ पडत नसल्याने सरावासाठी आम्हाला देशाबाहेरच जावे लागते.’ आंचलचे वडील रोशन म्हणाले,‘देशात गुलमर्ग आणि औली येथेच विश्व दर्जाच्या स्किर्इंग सुविधा आहेत पण या सुविधांची डागडुजी होत नाही. युरोपात वर्षभरात दहा महिने सराव होतो. विदेशात सराव करणे फारच महागडे आहे. स्कि, बूट आणि कपडे यावर जवळपास चार-पाच लाख खर्च होतो.’ऐतिहासिक पदक विजेत्या आंचलचे पुढील लक्ष्य द. कोरियात पुढील महिन्यात आयोजित शीतकालीन स्पर्धांसाठी पात्रता गाठणे हे आहे. पात्रता गाठण्यासाठी पाच रेसमध्ये १४० पेक्षा कमी गुण
मिळवावे लागतात. कालच्या रेसमध्ये माझ्यासह सुवर्ण विजेत्या स्पर्धकाला देखील १४० पेक्षा कमी गुण
मिळविता आले नाहीत, असे आंचलने सांगितले. (वृत्तसंस्था)
पंतप्रधानांनी केले कौतुक
मनालीच्या आंचल ठाकूर हिने आंतरराष्टÑीय स्तरावर भारताला पहिले पदक मिळवून दिले असून या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंचलचे कौतुक केले.आंचलने स्वत:च्या टिष्ट्वटर अकाऊंटवरून भारतीय क्रीडा विश्वाला ही गोड बातमी दिली. आंचलने लिहिले,‘एक गोड घटना आज घडली. मी पहिल्या आंतरराष्टÑीय पदकाची कमाई केली.’ आंचलचे टिष्ट्वट वाचून मोदी यांनीही टिष्ट्वटरच्या माध्यमातून आंचलचे कौतुक केले.‘स्किर्इंग खेळातील पदकाबद्दल तुझे अभिनंदन. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल देशाला गर्व आहे. तुझ्या पुढील वाटचालीबद्दल खूप खूप शुभेच्छा...’, असे मोदी यांनी लिहिले. केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी देखील आंचलचे तोंडभरून कौतुक केले.