रिओ ऑलिम्पिकमध्ये १० पेक्षा जास्त पदके मिळण्याची अपेक्षा
By admin | Published: April 27, 2016 04:00 PM2016-04-27T16:00:17+5:302016-04-27T16:00:17+5:30
आगामी रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पारड्यात १० पेक्षा जास्त पदके मिळतील अशी अपेक्षा वर्तविण्यात आली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - आगामी रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पारड्यात १० पेक्षा जास्त पदके मिळतील अशी अपेक्षा वर्तविण्यात आली आहे.
रिओ ऑलिम्लिकमध्ये भाग घेण्यासाठी ११० खेळाडूंची निवड समितीने केली आहे. यामध्ये जवळजवळ ७६ खेळाडू आधीच रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र झाले आहेत. तसेच, यंदाच्या या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या वाट्याला १० पेक्षा अधिक पदके मिळण्याची आशा आहे, अशी माहिती क्रिडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी राज्यसभेत दिली.
माझा विश्वास आहे की, रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करुन भारताच्या पारड्यात अनेक पदके मिळवतील. गेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये ६० भारतीय खेळांडू भाग घेतला होता, असेही क्रिडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी यावेळी सांगितले.
रिओ ऑलिम्पिकसाठी अनुराग ठाकूर यांच्यासह काही क्रिडाप्रतिनिधीनी खेळाडूंची निवड केली आहे.