पुजारा-साहा जोडीचा धमाका, भारत सुस्थितीत
By admin | Published: March 19, 2017 01:02 PM2017-03-19T13:02:22+5:302017-03-19T13:02:22+5:30
चेतेश्वर पुजारा आणि रिद्धिमान साहा जोडीने सातव्या विकेटसाठी केलेल्या नाबाद 132 धांवाच्या भागिदारीच्या जोरावर तिसऱ्या कसोटीत भारत मजबूत स्थितीत आहे.
ऑनलाइन लोकमत
रांची, दि. 19 - चेतेश्वर पुजारा आणि रिद्धिमान साहा जोडीने सातव्या विकेटसाठी केलेल्या नाबाद 132 धांवाच्या भागिदारीच्या जोरावर तिसऱ्या कसोटीत भारत मजबूत स्थितीत आहे. चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात साहा व पुजारा यांनी संयमी फलंदाजी करीत भारताच्या डावाला आकार दिला. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा भारताने सहा गड्यांच्या मोबदल्यात 466 धावा केल्या आहेत. भारताकडे 15 धावांची आघाडी असून साहा 76 आणि पुजारा 175 धावांवर खेळत आहे.
भारताने आज 6 बाद 360 धावांवरुन खेळायला सुरुवात केली. पहिल्या सत्रात भारताने75 केल्या असल्या तरी या सत्रात भारताने एकही फलंदाज गमावलेला नाही. पुजारा आणि साहा यांनी जबाबदारीने फलंदाजी केली असून शतकी भागिदारी रचली आहे.
भारताने कालच्या १ बाद १२० धावसंख्येवरून आज पुढे खेळण्यास सुरुवात केली. भारतीय डावात पुजाराने सूत्रधाराची भूमिका बजावली. पुजाराने ११ वे कसोटी शतक झळकावले तर कर्णधार विराट कोहली ६ धावा काढून बाद झाला.
भारतीय संघाला फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर तिसऱ्या दिवशी केवळ २४० धावा फटकावता आल्या. पुजाराने ६ तास ५२ मिनिटे खेळपट्टीवर तळ ठोकताना ३२८ चेंडूंना सामोरे जात १७ चौकार लगावले. दुसऱ्या टोकाकडून रिद्धिमान साहा याने १८ धावा फटकावल्या. अखेरच्या सत्रात हेजलवुडने करुण नायरला (२३) बाद करीत आॅस्ट्रेलियाला यश मिळवून दिले. नायरने पुजारासोबत ४४ धावांची भागीदारी केली. आॅस्ट्रेलियातर्फे पॅट कमिन्स सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ५९ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. त्याने आर. आश्विनला (३) माघारी परतवले. त्यानंतर साहा व पुजारा यांनी संयमी फलंदाजी करीत डाव सावरला.