अफगाणिस्तानच्या या विस्फोटक खेळाडूने कोहलीला टाकलं मागे
By Admin | Published: March 13, 2017 03:36 PM2017-03-13T15:36:43+5:302017-03-13T15:36:43+5:30
अफगाणिस्तानचा विस्फोटक फलंदाज मोहम्मद शहजादने एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीला मागे टाकलं.
>ऑनलाइन लोकमत
ग्रेटर नोयडा, दि. 13 - अफगाणिस्तानचा विस्फोटक फलंदाज मोहम्मद शहजादने एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीला मागे टाकलं. टी-20 सामन्यात सर्वाधिक धावा बनवणारा तो चौथा फलंदाज बनला आहे.
ग्रेटर नोयडामध्ये अफगाणिस्तान आणि आयर्लंड यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका झाली. यातील अंतिम सामन्यात या विकेटकिपर-फलंदाज खेळाडूने केवळ 27 चेंडूत 72 धावांची तडाखेबंद खेळी केली. त्याच्या या खेळीच्या बळावर अफगाणिस्तानने आयर्लंडचा 28 धावांनी पराभव केला. यासोबत तीन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडचा 3-0 असा पराभव करत निर्विवाद वर्चस्व गाजवलं.
58 सामन्यात शहजादने 1779 धावा बनवल्या आहेत, कोहलीपेक्षा त्याने 70 धावा बनवल्या आहेत. कोहलीने 48 सामन्यात 1709 धावा बनवल्यात. हे ही खरं आहे की कोहलीने शहजादपेक्षा 10 सामने कमी खेळले असून त्याची फलंदाजीची सरासरीही शहजादपेक्षा चांगली आहे. शहजादच्या पुढे आता केवळ मार्टिन गप्टिल, तिलकरत्ने दिलशान आणि ब्रॅंडन मॅक्यूलम हे खेळाडू आहेत.