एफ-वन रेसर हॅमिल्टनचे वर्णद्वेषाविरुद्धची मोहीम कायम ठेवण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 12:35 AM2020-07-14T00:35:44+5:302020-07-14T00:36:10+5:30
वर्णद्वेषाविरुद्ध मोहीम राबविताना मोसमातील दुसऱ्या स्टायरियन ग्रांप्रीमध्ये सहभागी झालेल्या सर्व २० चालकांनी आपल्या टी-शर्टवर ‘एन्ड रेसिझम (वर्णद्वेष संपवा) लिहिले होते.
Next
स्पीलबर्ग : फॉर्म्युला वन (एफ वन) चॅम्पियन लुईस हॅमिल्टनने यंदाच्या मोसमात पहिला विजय नोंदवल्यानंतर आपल्या सहकारी चालकांना वर्णद्वेषाविरुद्धचा लढा कमकुवत होऊ न देण्याचे आवाहन केले आहे.
वर्णद्वेषाविरुद्ध मोहीम राबविताना मोसमातील दुसऱ्या स्टायरियन ग्रांप्रीमध्ये सहभागी झालेल्या सर्व २० चालकांनी आपल्या टी-शर्टवर ‘एन्ड रेसिझम (वर्णद्वेष संपवा) लिहिले होते. त्याआधी खेळाडूंनी गेल्या आठवड्यात मोसमाच्या पहिल्या ग्रांप्रीमध्येही हेच केले होते.