Bravo : जागतिक तिरंदाजीत भारतीयांनी गाजवला दिवस, एका दिवशी तीन 'सुवर्ण'सह जिंकली पाच पदकं!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 06:19 PM2021-08-14T18:19:24+5:302021-08-14T18:20:11+5:30

World Archery Youth Championships पोलंड येथे सुरू असलेल्या जागितक युवा अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या तिरंदाजांनी वर्चस्व गाजवले.

Fabulous day for India in Cadet Compound events of World Archery Youth Championships, Won 5 medals (3 Gold, 1 Silver & 1 Bronze) | Bravo : जागतिक तिरंदाजीत भारतीयांनी गाजवला दिवस, एका दिवशी तीन 'सुवर्ण'सह जिंकली पाच पदकं!

Bravo : जागतिक तिरंदाजीत भारतीयांनी गाजवला दिवस, एका दिवशी तीन 'सुवर्ण'सह जिंकली पाच पदकं!

Next

पोलंड येथे सुरू असलेल्या जागितक युवा अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या तिरंदाजांनी वर्चस्व गाजवले. शनिवारी भारतानं तीन सुवर्ण, १ रौप्य व १ कांस्य अशा पाच पदकांची कमाई केली. भारताच्या प्रिया गुर्जर, परनीत कौर आणि रिधु सेंथीलकुमार यांनी १८ वर्षांखालील कम्पाऊंड कॅडेट महिला संघाच्या अंतिम सामन्यात कमालीचे सातत्य राखत २२८-२१६ ने तुर्कीला हरवले. आजच्या दिवसातील भारताचे हे पहिले पदक ठरले आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक अशी चार पदकं जिंकली.



भारताच्या पुरुष कॅडेट संघानेही अमेरिकेला २३३-२३१ असे नमवून आणखी एक सुवर्ण नावावर केलं. या टीममध्ये साहिल चौधरी, मिहीर नितीन आणि कुशल दलाल यांचा सहभाग होता. ( Indian men Cadet team of Sahil Chaudhary, Mihir Nitin and Kushal Dalal won Gold medal as they beat USA by 233-231 in compound cadet Final) 

कॅडेट मिश्र गटातही भारताच्या नावावर सुवर्णपदक राहिले. कुशल दलाल व प्रिया गुर्जार यांनी अमेरिकेवर १५५-१५२ असा विजय मिळवला.  


परनीत कौरनं महिला कम्पाऊंड कॅडेट गटातील कांस्यपदकाच्या लढतीत ब्रिटनच्या खेळाडूवर १४०-१३५ असा विजय मिळवून भारताच्या खात्यात आणखी एक पदक जमा केले. प्रिया गुर्जर हिला सुवर्णपदकाच्या सामन्यात मॅक्सिकन खेळाडूकडून १३६-१३९ असा पराभव पत्करावा लागल्यानं रौप्यपदकावर समाधान मानावे लागले   

Web Title: Fabulous day for India in Cadet Compound events of World Archery Youth Championships, Won 5 medals (3 Gold, 1 Silver & 1 Bronze)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.