पदक जिंकण्यात भारतीय महिलांना आले अपयश
By admin | Published: May 9, 2015 01:45 AM2015-05-09T01:45:08+5:302015-05-09T01:45:08+5:30
नवी दिल्ली: भारताच्या कोणत्याही पहिलवानाने दोहामध्ये सुरू असलेल्या वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये पदक जिंकता आले नाही़ बबिता कुमारी महिलांच्या फ्री स्टाईलमध्ये 53 किलो वजनी गटात कांस्यपदकाच्या लढतीपर्यंत पोहोचली होती़ तिला येथे कजाकिस्तानच्या जुलडीज एशिमोवा तुर्तबायेवाकडून 3-6 ने पराभवाला सामोरे जावे लागल़े तत्पूर्वी बबिता सेमीफायनलमध्ये उत्तर कोरियाच्या पाक योंग मीकडून पराभूत झाली होती़
Next
न ी दिल्ली: भारताच्या कोणत्याही पहिलवानाने दोहामध्ये सुरू असलेल्या वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये पदक जिंकता आले नाही़ बबिता कुमारी महिलांच्या फ्री स्टाईलमध्ये 53 किलो वजनी गटात कांस्यपदकाच्या लढतीपर्यंत पोहोचली होती़ तिला येथे कजाकिस्तानच्या जुलडीज एशिमोवा तुर्तबायेवाकडून 3-6 ने पराभवाला सामोरे जावे लागल़े तत्पूर्वी बबिता सेमीफायनलमध्ये उत्तर कोरियाच्या पाक योंग मीकडून पराभूत झाली होती़महिलांच्या 55 किलो वजनी गटात ललिताला सेमीफायनलमध्ये उत्तर कोरियाच्या हान कुम ओकने 3-9 ने हरवल़े महिलांच्या 63 किलो वजनी गटात चोइ जियीला 6-1 ने हरवले; मात्र यानंतर सेमीफायनलमध्ये चीनच्या झुओ मा झिलुओकडून ती 0-10 ने पराभूत झाली़ अनिताकडे कांस्यपदक जिंकण्याची संधी होती; मात्र मंगोलियाच्या इंकेबायर सेवेगमीडने तिचे हे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही़ यादरम्यान साक्षी मलिकने आज चारपैकी दोन लढती जिंकल्या आहेत़ ती 60 किलो वजनी गटातील पहिल्या फेरीमध्ये चीनच्या लुओ झियाजुआनकडून पराभूत झाली; मात्र यानंतर मंगोलियाच्या मुनखतुया तुनगालागला 13-0 ने हरवल़े पाचव्या फेरीमध्ये साक्षीने कजाकिस्तानच्या अयालिम कासीमोवाला 8-1 ने हरवल़े सुमन कुंडू 69 किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व फेरीमध्ये जपानच्या कायोको कुडोकडून पराभूत झाली़