विख्यात बॉक्सर मोहम्मद अली यांचे निधन

By admin | Published: June 4, 2016 10:09 AM2016-06-04T10:09:08+5:302016-06-04T17:04:25+5:30

बॉक्सिंगच्या दुनियेतील एक उत्तुंग शिखर असेलेले विख्यात बॉक्स मोहम्मद अली यांचे अमेरिकेत निधन झाले.

Famous boxer Mohammad Ali dies | विख्यात बॉक्सर मोहम्मद अली यांचे निधन

विख्यात बॉक्सर मोहम्मद अली यांचे निधन

Next
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. ०४ - बॉक्सिंगच्या (मुष्टियुद्ध) दुनियेतील एक उत्तुंग शिखर असेलेले, चॅम्पियन अशी ख्याती असलेले बॉक्सर मोहम्मद अली यांचे अमेरिकेत निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. श्वसनास त्रास होऊ लागल्यामुळे मोहम्मद अली यांना शुक्रवारी अमेरिकेतील अॅरिझोना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. अली यांच्या कुटुंबाचे प्रवक्ते बॉब गनेल यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. मोहम्मद अली यांच्या निधनामुळे फक्त एक महान खेळाडू नव्हे तर जगातील मानवी हक्क चळवळीस प्रेरणा देणारा एक खंदा कार्यकर्ता हरवल्याची भावना व्यक्त होत आहे.
' अली यांची प्रकृती खूप ढासळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना सर्वोत्तम उपचार देण्यात येत आहेत' असे निवेदन कालच गनेल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र अवघ्या काही तासांतच अली यांची प्रकृती ढासळली व त्यांची प्राणज्योत मालवली. 
 
बॉक्सिंगच्या दुनियेतील महान खेळाडू असलेले अली यांची 'हेविवेट चॅम्पियन' अशी ओळख होती. तीनेवळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या मोहम्मद अलींनी ऑलिंपिकमध्ये मुष्टियुद्ध खेळात सुवर्णपदक जिंकले होते. 
 
मात्र बॉक्सिंगमधून निवृत्त झाल्यानंतर १९८४ साली ते पार्किन्सन आजारामुळे त्रस्त होते, त्या आजाराशी त्यांनी अनेक वर्ष लढा दिला. मात्र याच आजाराने आज त्यांना हरवले.  गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती व श्वसनास होऊ लागलेल्या त्रासामुळे त्यांनादोन दिवसांपूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 
 
सोशल मीडियावर चाहत्यांनी वाहिली श्रद्धांजली
दरम्यान मोहम्मद अली यांच्या निधनाचे वृत्त येताच जगभरातील त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली असून सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अली यांनी बॉक्सिंग खेळाच्या जगभरातील चाहत्यांना झपाटून टाकले होते. बॉक्सिंग रिंगमधील त्यांच्या चपळ हालचाली, वेगवान ठोसेबाजी, प्रतिस्पर्ध्याचा ठोका चुकवताना तत्काळ मागे जाण आणि अकस्मात पुढे येऊन हल्ला करणं ही मोहम्मद अली यांच्या खेळाची खासियत होती. अली यांनी ५६ विजय ( त्यापैकी ३७ हे नॉकआऊट) मिळवले असून अवघ्या ५ सामन्यात पराभव पत्करावा लागला.

Web Title: Famous boxer Mohammad Ali dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.