भारताविरुद्ध आॅस्ट्रेलियन संघात वेगवान गोलंदाजांचा जास्त भरणा
By Admin | Published: January 4, 2016 11:57 PM2016-01-04T23:57:08+5:302016-01-04T23:57:08+5:30
आॅस्ट्रेलियाने भारताविरुद्ध पहिल्या तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी सोमवारी जाहीर केलेल्या १३ सदस्यीय संघात जास्त वेगवान गोलंदाजांचा भरणा केला आहे
सिडनी : आॅस्ट्रेलियाने भारताविरुद्ध पहिल्या तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी सोमवारी जाहीर केलेल्या १३ सदस्यीय संघात जास्त वेगवान गोलंदाजांचा भरणा केला आहे. या संघात फिरकी गोलंदाज नाथन लियोन आणि अष्टपैलू शेन वॉटसन यांना स्थान देण्यात आले नाही.
पर्थ, मेलबोर्न आणि सिडनी येथील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी पोषक ठरणार आहे. त्यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन लढतींसाठी, तर गोलंदाजांची आवश्यकतादेखील भासणार नाही.
निवड समितीचे अध्यक्ष रॉड मार्श यांनी स्कॉट आणि पॅरिस हे दोघेही संघात स्थान मिळविण्यास पात्र होते, असे सांगितले. ते म्हणाले की, ‘स्कॉट सातत्याने निवड समितीला प्रभावित करीत होता. त्याने या वर्षी व्हिक्टोरियाकडून खूप चांगली गोलंदाजी केली व निश्चितच तो मोठ्या पातळीवर खेळण्यास योग्य होता.’
आॅस्ट्रेलिया दौऱ्यात भारत प्रथम पाच वनडे सामने खेळणार आहे. हे वनडे सामने पर्थ (१२ जानेवारी), ब्रिस्बेन (१५ जानेवारी), मेलबोर्न (१७ जानेवारी), कॅनबरा (२0 जानेवारी) आणि सिडनी (२३ जानेवारी) येथे खेळवले जातील. वनडे मालिकेनंतर तीन सामन्यांची टी-२0 मालिका होणार आहे. (वृत्तसंस्था)
> आॅस्ट्रेलियन संघ पुढीलप्रमाणे : स्टीव स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, जॉर्ज बेली, स्कॉट बोलँड, जोश हेजलवूड, जेम्स फॉकनर, आरोन फिंच, मिशेल मार्श, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, जोल पॅरिस आणि
मॅथ्यू वेड.