वेगवान गोलंदाजांची कामगिरी शानदार ठरली

By admin | Published: October 18, 2016 04:32 AM2016-10-18T04:32:42+5:302016-10-18T04:32:42+5:30

‘वेगवान गोलंदाजांची कामगिरी शानदार ठरली. आम्हाला येथे वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची अपेक्षा नव्हती.

Fast bowlers' performance was fantastic | वेगवान गोलंदाजांची कामगिरी शानदार ठरली

वेगवान गोलंदाजांची कामगिरी शानदार ठरली

Next


धर्मशाला : ‘वेगवान गोलंदाजांची कामगिरी शानदार ठरली. आम्हाला येथे वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची अपेक्षा नव्हती. मात्र, त्यांनी चमकदार कामगिरी करून संघाला विजयी केले,’ अशा शब्दांत भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातील विजयाचे श्रेणी वेगवान गोलंदाजांना दिले.
सामन्यात निर्णायक कामगिरी केलेल्या हार्दिक पंड्याविषयी धोनी म्हणाला, ‘एकदिवसीय पदार्पण केलेल्या पंड्याने चांगल्या लयीमध्ये गोलंदाजी करून चमकदार सुरुवात केली. त्याला नव्या चेंडूवर गोलंदाजी करण्याची संधी द्यायची होती. जसप्रीत बुमराहदेखील चांगला गोलंदाज असून तो जुन्या चेंडूनेही खेळू शकतो. त्यामुळे मध्यल्या वेळेतही आम्ही त्याला उतरवू शकलो असतो. म्हणून सुरुवातीला पंड्याला संधी दिली.’’
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पंड्याचा संघात असलेल्या समावेशाबद्दल धोनीने सांगितले, ‘‘या स्पर्धेआधी आम्हाला काही सामने खेळायचे असून वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये पंड्या कसा खेळतो, हे बघायचे आहे. आता तर तो पहिलाच एकदिवसीय सामना खेळलेला असल्याने आगामी स्पर्धेत त्याला खेळविण्यावरून पर्याय उपलब्ध आहेत. परंतु, कामगिरीत सातत्य राखण्याचे त्याच्यापुढे आव्हान असेल. यावरच पुढील निर्णय अवलंबून असतील.’’ (वृत्तसंस्था)

Web Title: Fast bowlers' performance was fantastic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.