एफसी पुणो दुस:या विजयासाठी उत्सुक
By admin | Published: October 30, 2014 01:26 AM2014-10-30T01:26:50+5:302014-10-30T01:26:50+5:30
होम ग्राउंडवर पहिला विजय मिळविल्यानंतर आत्मविश्वास वाढलेला एफसी पुणो संघ सचिन तेंडुलकरच्या केरळ ब्लास्टरविरुद्ध दुसरा विजय मिळविण्यासाठी उत्सुक आहे.
Next
मिलिंद कांबळे - पुणो
होम ग्राउंडवर पहिला विजय मिळविल्यानंतर आत्मविश्वास वाढलेला एफसी पुणो संघ सचिन तेंडुलकरच्या केरळ ब्लास्टरविरुद्ध दुसरा विजय मिळविण्यासाठी उत्सुक आहे.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मुख्य स्टेडियमच्या मैदानावर होणा:या या लढतीसाठी पुणो संघ सज्ज आहे. अॅथलेटिको दो कोलकत्ता क्लबला त्याच्याच मैदानात बरोबरी रोखल्याने केरळचा आत्मविश्वास दुणावला आहे. विजय प्राप्त करीत सातव्या स्थानावरुन वर येणारा प्रय} संघाचा आहे.
पुणो सिटी क्लबला दिल्लीसोबत पहिला सामना शून्य बरोबरीत राखला. मात्र, दुस:या सामन्यात मुंबईकडून क्-5 ने पराभव पत्करला. म्हाळुंगे- बालेवाडीत झालेल्या रविवारच्या सामन्यात गोवाला 2-क् ने नमवित पुणो सिटीने पहिला विजय प्राप्त केला. त्यामुळे संघाचे मनोबल उंचावले आहे. चौथ्या सामन्यात होम ग्राउंडवर कामगिरी उंचावत दुसरा विजय प्राप्त करण्याच्या इराद्याने संघ खेळणार आहे. पाठीराख्यांचे मोठे पाठबळ पुणो सिटीला मिळणार आहे. त्याचा लाभ खेळाडूंना मिळेल.
केरळ ब्लास्टर क्लबला पहिला व दुस:या सामन्यात पराभवास सामोरे लावे लागले. कोलकत्ता येथे झालेल्या तिस:या लढतीत संघाने कोलकत्ता क्लबला 1-1 असे बरोबरीत रोखत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या कामगिरीमुळे संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. हाच वेग कायम ठेवत उद्याच्या सामन्यात यश मिळवून शेवटून दुस:या म्हणजे सातव्या स्थानावरुन वरच्या स्थानी जाण्याचा प्रय} संघ करणार आहे.
अॅथलेटिको डो कोलकत्ता क्लब विरुद्धाच्या त्याच्याच मैदानात खेळताना अॅर्टिफिशल टर्फ मैदानात गुडघा दुखावल्या. सध्या पूर्वी सारखी चांगल्या दर्जाचे ऑर्टिफिशल टर्फ मैदान राहिले नसल्याने खेळाडू जखमी होत आहेत. याचा फटका बसल्याचे चोप्रा याने नमूद केले. जखमी भरुन निघेपर्यत विश्रंती घेणार असल्याने उद्याची लढतीत खेळणार नसल्याचे त्याने सांगितले.
संघ 2 लढतीत पराभूत झाला. संघाच्या तिस:या सामन्यात कोलकत्ता या बलाढय़ संघाला त्याचाच होम ग्राउंडवर रोखले. सामना ड्रॉ केल्याने संघाचे मनोबल उंचावले आहे.
लढतीसाठी देशभरात प्रवास आणि दगदग असल्याने स्पर्धापूर्व सराव न करता विश्रंतीचा निर्णय संघाने घेतला. त्यामुळे संघाने म्हाळुंगे- बालेवाडीच्या श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलाच्या मुख्य मैदानात आज सराव केला नाही.
तंदुरुस्त असल्याने जोर्कीम खेळणार : फॅन्को
पिंपरी : दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त झाल्याने पुणो सिटी क्लबचा मुख्य खेळाडू जोर्कीम अब्राचेस उद्याच्या सामन्यात खेळणार आहे. संघाच्या कामगिरीबाबत समाधानी असल्याचे एफसी पुणो संघाचे प्रशिक्षक फॅन्को कोलंबा यांनी सांगितले.जखमी झाल्याने जोर्कीम खेळू शकला नव्हता. तसेच, ओमर आणि मिडफिल्डर मनीष मेथानी हे दोघेही जखमी होते. जोर्कीम व मनीष तंदुरुस्त असल्याने ते खेळणार आहेत. आतापर्यतची कामगिरी उत्तम असल्याचे यावर समाधानी असल्याचे प्रशिक्षक कोलंबा यांनी नमूद व्यक्त केले.
मायकेल चोप्रा खेळणार नाही
पिंपरी : गुडघा दुखावल्याने स्टॉयकर्स खेळाडू मायकेल चोप्रा उद्या गुरुवारी एफसी पुणोविरुद्धच्या लढतीत खेळू शकणार नाही. यामुळे केरळ ब्लॉस्टर क्लबला त्याच्याशिवाय उद्या मैदानात उतरावे लागणार असल्याचे मायकल चोप्राने स्वत: पत्रकार परिषदेत सांगितले.