खेळाडू ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2015 01:38 AM2015-04-15T01:38:47+5:302015-04-15T01:38:47+5:30

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूने सट्टेबाजांच्या जाळ्यात न फसण्याचा सल्ला दिला आहे. त्यात प्रामुख्याने सुंदर ललनांपासून दूर राहण्याची सूचना केलेली आहे.

Fearing to get involved in a player 'Honey Trap' | खेळाडू ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकण्याची भीती

खेळाडू ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकण्याची भीती

googlenewsNext

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगची (आयपीएल) प्रतिमा सुधारणे आणि स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा सट्टेबाजीपासून बचाव करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) खेळाडूने सट्टेबाजांच्या जाळ्यात न फसण्याचा सल्ला दिला आहे. त्यात प्रामुख्याने सुंदर ललनांपासून दूर राहण्याची सूचना केलेली आहे.
आयपीएलमध्ये सट्टेबाजी व स्पॉट फिक्सिंगचे वृत्त पुढे आल्यानंतर बीसीसीआयने कडक पाऊल उचलले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी समितीच्या सदस्यांनी सर्व आठ संघांच्या खेळाडूंसोबत बैठक घेतली आणि त्यांना सट्टेबाज व त्यांच्या नव्या चालींमध्ये न अडकण्याचा सल्ला दिला आहे.
गेल्या आठवड्यात राजस्थान रॉयल्सच्या एका खेळाडूसोबत मुंबईतील त्याच्या निवासस्थानी सट्टेबाजांनी संपर्क साधला, असे वृत्त आले होते. त्यानंतर बीसीसीआयने सट्टेबाजांना रोखण्यासाठी कडक पाऊल उचललेले आहे. दरम्यान, बोर्डाने यात सामील असलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केलेली नाहीत. याबाबत बोलताना आयपीएलच्या एका फ्रॅन्चायझीच्या अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, बीसीसीआयने खेळाडूंना सट्टेबाजांच्या जाळ्यात न अडकण्याचा सल्ला दिला आहे. अधिकारी पुढे म्हणाले, ‘बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी व सुरक्षा समितीच्या (एसीएसयू) सदस्यांनी खेळाडूंसोबत बैठक घेतली आणि सट्टेबाज खेळाडूंना जाळ्यात अडकवण्यासाठी नव्या योजना आखत असल्याचे सांगितले. त्यात सुंदर मुलींच्या माध्यमातून जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. विशेषत: प्रथमच आयपीएल स्पर्धेत सहभागी होत असलेल्या युवा खेळाडूंनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.’
दरम्यान, बीसीसीआयने यापूर्वीही खेळाडूंना ‘हनी ट्रॅप’मध्ये न फसण्याबाबत सूचना केली होती, पण राजस्थान रॉयल्सच्या एका खेळाडूसोबत अलीकडेच सट्टेबाजांनी संपर्क साधल्याच्या वृत्तानंतर बोर्डाने कडक पाऊल उचलण्याची तयारी केली असून, खेळाडूंना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
सट्टेबाज खेळाडूंसोबत संपर्क साधण्यासाठी सुंदर मुलींचा आधार घेतात. त्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी आयपीएल खेळाडूंना बीसीसीआयने सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला होता. आयपीएल सुरू होण्याच्या एक आठवडापूर्वी संपलेल्या आयसीसी विश्वकप स्पर्धेदरम्यानही खेळाडूंना अनोळखी सुंदर मुलींपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला होता.
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेकदा सट्टेबाज खेळाडूंचे चाहते असल्याचे भासवताना त्यांच्या खासगी जीवनात स्थान मिळवतात आणि त्यानंतर खेळाडूंना नवे-नवे प्रलोभन दाखवत आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतात. सुंदर मुलींच्या माध्यमातून सट्टेबाज खेळाडूंना आपल्या जाळ्यात ओढतात आणि त्यानंतर त्यांना स्पॉट फिक्सिंग व सट्टेबाजीसाठी बाध्य करतात.
(वृत्तसंस्था)

च्बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने याबाबत बोलताना सांगितले की, ‘सट्टेबाजीचा समूळ नायनाट करण्यासाठी बोर्डातर्फे कडक पावले उचलली जात आहेत. क्रिकेट बोर्ड सट्टेबाजीचा नायनाट करण्यासाठी प्रयत्नशील आहे.’
च्यापूर्वी राजस्थान रॉयल्सच्या एका खेळाडूसोबत सट्टेबाजाने संपर्क साधल्याच्या वृत्तानंतर आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला यांनी खेळाडूंना सावधगिरी बाळगण्याचे व सट्टेबाजांबाबतची सूचना बोर्डाला देण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Fearing to get involved in a player 'Honey Trap'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.