फेडरेशन चषक खो-खो स्पर्धा : सलग सतव्यांदा महाराष्ट्राला दुहेरी मुकुट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 09:41 PM2019-06-03T21:41:09+5:302019-06-03T21:41:35+5:30

प्रतीक वाईकर व प्रियंका भोपी स्पर्धेत सर्वोत्कृष्ठ 

Federation Cup-Kho-Kho Competition: both Crowns for Maharashtra | फेडरेशन चषक खो-खो स्पर्धा : सलग सतव्यांदा महाराष्ट्राला दुहेरी मुकुट

फेडरेशन चषक खो-खो स्पर्धा : सलग सतव्यांदा महाराष्ट्राला दुहेरी मुकुट

Next

मुंबई : खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व पूदूचेरी येथे झालेली 30वी फेडरेशन चषक खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी निर्विवाद वर्चस्व राखत सलग सतव्यांदा विजेतेपद पटकावले.

या स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने कोल्हापूरचा १४-१३ (१०-६, ४-७) असा तब्बल चार मि. राखून दणदणीत विजय साजरा केला. या सामन्यात महाराष्ट्राच्या प्रतिक  वाईकरने २:००, १:५० मि. संरक्षण करत तीन गडी बाद केले, सुयश गरगटेने १:५०, १:०० मि. संरक्षण करत दोन गडी बाद केले, अक्षय गणपुलेने १:३०, १:३० मि. संरक्षण केले, ऋषिकेश मुर्चावडेने १:१०, मि. संरक्षण केले व १ गडी बाद केला, कर्णधार श्रेयस राऊळने ३ गडी बाद करत विजयात सिहाचा वाटा उचलला. तर कोल्हापूरच्या अभिनंदन पाटिलने १:२० मि. संरक्षण करत तीन गडी बाद केले, सागर पोदारने १:०० मि. संरक्षण करत दोन गडी बाद केले तर नीलेश पाटिलने दोन गडी बाद केले मात्र ते आपल्या संघाला परभवापासून वाचवू शकले नाहीत.

महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने गुजरातचा १०-०६ असा एक डाव चार गुणांनी धुव्वा उडवत रुबाबात विजेतेपद मिळवले. महाराष्ट्राच्या प्रियंका भोपीने नाबाद ४:४० ०, १:४० मि. संरक्षण करत १ बळी मिळवला, रूपाली बडेने २:१०, २:०० मि. संरक्षण केले, काजल भोरने २: ४० मि. संरक्षण करत ३ बळी मिळवले, अपेक्षा सुतारने २:१० मि. संरक्षण केले व विजयश्री खेचून आणली. गुजरातच्या प्रिया चौधरीने २:१० मि. संरक्षण करत १ बळी मिळवला,निकिता सोलंकीने व अर्पिता गामितने प्रत्येकी १:०० मि. संरक्षण केले तर कोमल सोलंकीने ३ बळी मिळवत दिलेली जोरदार लढत अपयशी ठरली.

Web Title: Federation Cup-Kho-Kho Competition: both Crowns for Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.