फेडररने जिंकले सातवे सिनसिनाटी विजेतेपद
By admin | Published: August 25, 2015 04:18 AM2015-08-25T04:18:21+5:302015-08-25T04:18:21+5:30
स्वीसचा दिग्गज रॉजर फेडरर याने जगातील नंबर वन खेळाडू नोव्हाक जोकोविच याचा ७-६, ६-३ असा पराभव करून सातव्यांदा सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेचे
सिनसिनाटी : स्वीसचा दिग्गज रॉजर फेडरर याने जगातील नंबर वन खेळाडू नोव्हाक जोकोविच याचा ७-६, ६-३ असा पराभव करून सातव्यांदा सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
फेडररने उपांत्य फेरीत अँडी मरेला पराभूत केल्यानंतर जोकोविचला विजेतेपदाच्या लढतीत धूळ चारली. विम्बल्डन फायनलमध्ये जोकोविचकडून पराभूत झाल्यानंतर रॉजर फेडरर पहिलीच स्पर्धा खेळत होता. विजयानंतर फेडरर म्हणाला, ‘‘हा सुरेख विजय आहे. मी बऱ्याच कालावधीपासून खेळलो नव्हतो. त्यामुळे मला विजयाची आशा नव्हती.’’ या विजयामुळे मरेला पिछाडीवर टाकून फेडरर दुसऱ्या स्थानावर कब्जा करणार आहे.
तसेच, ३१ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या अमेरिकन ओपनमध्ये त्याला द्वितीय मानांकन मिळेल. फेडररचे हे ८७वे एटीपी विजेतेपद आणि २४वे मास्टर्स ट्रॉफीचे अजिंक्यपद आहे.
(वृत्तसंस्था)
सेरेना अजिंक्य
गत चॅम्पियन अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने अखेरच्या ग्रँडस्लॅम यूएस ओपनवरदेखील
कब्जा करण्याचे संकेत देताना रुमानियाच्या सिमोना हालेप हिला पराभूत करून सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावावर केले. अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सने तृतीय मानांकित हालेप हिचा ६-३, ७-६ असा पराभव करताना विजेतेपदाचा बचाव केला.