बोल्टची कमतरता जाणवेल : को

By admin | Published: August 30, 2015 10:40 PM2015-08-30T22:40:48+5:302015-08-30T22:40:48+5:30

वेगाचा बादशाह उसेन बोल्ट याने जागतिक अ‍ॅथलेटीक्ससाठी दिलेले योगदान खुप मोलाचे आहे. ज्याप्रमाणे मोहम्मद अली यांनी बॉक्सिंगसाठी महत्त्वपुर्ण काम केले,

Feel the shortage of bolt: To | बोल्टची कमतरता जाणवेल : को

बोल्टची कमतरता जाणवेल : को

Next

बीजिंग : वेगाचा बादशाह उसेन बोल्ट याने जागतिक अ‍ॅथलेटीक्ससाठी दिलेले योगदान खुप मोलाचे आहे. ज्याप्रमाणे मोहम्मद अली यांनी बॉक्सिंगसाठी महत्त्वपुर्ण काम केले, तेच काम बोल्टने अ‍ॅथलेटीक्ससाठी केले आहे. त्यामुळेच त्याच्या निवृत्तीने खुप मोठी कतरता तर जाणवेलच, परंतु त्याच्यामुळे हा खेळ देखील जिवंत राहिल, असे वक्तव्य आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स संघाचे (एएफपी) नवनिर्वाचित अध्यक्ष सेबेस्टीयन को यांनी केले.
जमैकाच्या या विश्वविक्रमी धावपटूने २००८ पासून आॅलिम्पिक आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या विविध स्पर्धेत १८ सुवर्ण पदकांपैकी १७ सुवर्ण पदक पटकावण्याचा पराक्रम केला आहे. नुकताच त्याने आगामी रिओ आॅलिम्पिकनंतर निवृत्त होण्याचे संकेत देत सर्वांचे लक्ष वेधले होते.
(वृत्तसंस्था)

Web Title: Feel the shortage of bolt: To

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.