मैदानावर सकारात्मक आक्रमकता हवी

By admin | Published: March 30, 2017 01:29 AM2017-03-30T01:29:26+5:302017-03-30T01:29:26+5:30

‘आ क्रमकता’ हा शब्द विविध प्रकारे वापरला जातो हे मी ऐकले होते. यंदा भारतातील क्रिकेट मोसमात या शब्दाचा बराच उहापोह

On the field is a positive attacker | मैदानावर सकारात्मक आक्रमकता हवी

मैदानावर सकारात्मक आक्रमकता हवी

Next

हर्षा भोगले लिहितो..
‘आ क्रमकता’ हा शब्द विविध प्रकारे वापरला जातो हे मी ऐकले होते. यंदा भारतातील क्रिकेट मोसमात या शब्दाचा बराच उहापोह झाला. भारत-आॅस्ट्रेलिया मालिकेदरम्यान शाब्दिक चकमक गाजलीच शिवाय शारीरिक इशाऱ्यांनी खळबळ माजवताच वातावरण तापले होते. धरमशाला येथे वाक्युद्धाने तर कळस गाठला. पण यातून एक बोध घ्यायलाच हवा. आक्रमकता ही सकारात्मकतेने स्वीकारायला हवी. कायम कटुता येईल, असे कुठलेही वर्तन खेळाडूंकडून होऊ नये.
भारतीय संघ सामन्यादरम्यान बराच आक्रमक जाणवला. निर्णायक लढतीत पाच गोलंदाजांसह खेळणे व विजय मिळविणे ही एक प्रकारची आक्रमताच होती. विराटच्या अनुपस्थितीत रहाणे आणि विजय यांचे फलंदाजीत सातत्य नसताना तसेच नायर फारसा प्रभावी दिसत नसताना रहाणेने अंतिम एकादशची केलेली निवड ही देखील आक्रमकता म्हणावी लागेल. तळाच्या स्थानावरील फलंदाजांनी धावा काढून पाच गोलंदाज खेळविण्याचे समर्थन करणे तसेच सामना जिंकणे हे धाडसाचे काम होते. सहा फलंदाज खेळविणे विश्व क्रिकेटमध्ये बचावात्मक मानले जाते. अशास्थितीत विजयावर शिक्कामोर्तब करणे हे काम आक्रमकतेशिवाय शक्य नाही. तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी केलेल्या माऱ्यातून आक्रमकता स्पष्ट झाली. सामन्याअखेर अजिंक्य रहाणने फलंदाजीत दाखविलेली आक्रमकता, स्वयंनिर्धार आणि आत्मविश्वास यातून विजयाचा मार्ग प्रशस्त झाला.तिसऱ्या दिवशी भारतीयांनी केलेली गोलंदाजी या मालिकेत अधोरेखित करणारी घटना ठरली. उमेश यादवचे चेंडू फलंदाजांच्याू तोंडचे पाणी पळविणारे होते. अश्विन आणि जडेजा यांच्या फिरकीतील भेदकता प्रकर्षाने दिसली. जडेजा हा गडी बाद करणारा गोलंदाज म्हणून पुढे येत असल्याचा बदल उल्लेखनीय ठरला. १०६ धावांचे विजयी लक्ष्य गाठण्यासारखेच होते. लोकेश राहुलची आक्रमक फटकेबाजी पाहिल्यानंतर मला खात्री पटली की उत्कृष्ट फलंदाज असलेला राहुल आणखी बलाढ्य बनत चालला आहे. राहुलने स्वत:ला जखमांपासून दूर ठेवल्यास भविष्यात तो देखील महान द्रविड आणि कुंबळे यांच्यासारखाच आक्रमक खेळाडू बनू शकतो यात शंका नाही.

Web Title: On the field is a positive attacker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.