मॅराडोना लढविणार फिफा अध्यक्षपदाची निवडणूक

By admin | Published: June 23, 2015 01:37 AM2015-06-23T01:37:42+5:302015-06-23T01:37:42+5:30

अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना हा भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या आरोपामुळे चर्चेत असलेल्या फिफा (आंतरराष्ट्रीय फुटबॉल फेडरेशन) अध्यक्षपदाची

FIFA presidential election to fight Maradona | मॅराडोना लढविणार फिफा अध्यक्षपदाची निवडणूक

मॅराडोना लढविणार फिफा अध्यक्षपदाची निवडणूक

Next

पॅरिस : अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना हा भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या आरोपामुळे चर्चेत असलेल्या फिफा (आंतरराष्ट्रीय फुटबॉल फेडरेशन) अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार असल्याचे वृत्त आहे.
उरुग्वेच्या पत्रकाराला टीव्हीवर मुलाखत देताना मॅराडोनाने ही घोषणा केली. पत्रकार व्हिक्टर मोरालेस याने मॅराडोनाला निवडणुकीबाबतचा प्रश्न विचारताच तो उत्तरला, होय... मी उमेदवार आहे! मोरालेस पुढे म्हणाला,‘ मी मॅराडोनाला फोनवर त्याच्या वडिलांच्या तब्येतीची विचारपूस केली.’ मॅराडोना आणि मोरालेस हे संयुक्तपणे टीव्ही कार्यक्रम सादर करतात. मॅराडोना हा ब्लाटर यांचा कट्टर विरोधक आहे. ब्लाटर यांनी फिफा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता.

Web Title: FIFA presidential election to fight Maradona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.