फिफा वर्ल्डकपमध्ये यजमानांची झोळी रिकामीच!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 05:53 AM2022-11-30T05:53:41+5:302022-11-30T05:54:14+5:30
पाहुण्यांनी सुरुवातीपासूनच यजमानांच्या गोलपोस्टवर जोरदार हल्ले चढवले. सुरुवातीच्या खेळात गोल करण्यात अपयशी ठरल्यानंतर कोडी गॅक्पोने २६ मिनिटाला नेदरलँड्सला आघाडी मिळवून दिली.
दोहा : २०१४ पासून बाद फेरीची आस लाऊन बसलेल्या नेदरलँड्सची प्रतीक्षा अखेर संपली. मंगळवारी झालेल्या अ गटाच्या सामन्यात दुबळ्या कतारचा नेदरलँड्सने २-०ने धुव्वा उडविला आणि बाद फेरीत दिमाखात प्रवेश केला. यासह फुटबॉल विश्वचषकात यजमान कतारची झोळी रिकामीच राहिली. कोडी गॅक्पो आणि फ्रँकी डी जोंग नेदरलँड्सच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
पाहुण्यांनी सुरुवातीपासूनच यजमानांच्या गोलपोस्टवर जोरदार हल्ले चढवले. सुरुवातीच्या खेळात गोल करण्यात अपयशी ठरल्यानंतर कोडी गॅक्पोने २६ मिनिटाला नेदरलँड्सला आघाडी मिळवून दिली. गॅक्पोका हा सलग तिसऱ्या सामन्यातला तिसरा गोल ठरला. नेदरलँड्सकडून अशी कामगिरी करणारा तो चौथा खेळाडू ठरला आहे. त्यानंतर मध्यांतरापर्यंत कतारने नेदरलँड्सला अधिक यश मिळू दिले.
मात्र मध्यांतरानंतर लागलीच फ्रँकी डी लँगने ४९व्या मिनिटाला कतारच्या गोलजाळ्याचा अचूक वेध घेतला आणि नेदरलँड्सला २-० ची भक्कम आघाडी मिळवून दिली. ऑरेंज आर्मीच्या आक्रमणापुढे कतार हतबल झालेला दिसला. बलाढ्य नेदरलँड्सला अधिक गोलची अपेक्षा होती.