फिफा युवा विश्वचषकासाठी पायाभूत सुविधा सज्ज : सेप्पी

By admin | Published: February 18, 2017 01:02 AM2017-02-18T01:02:58+5:302017-02-18T01:02:58+5:30

२०१०च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तयारीसारखी अखेरच्या क्षणी नाचक्की होऊ नये याची काळजी घेत १७ वर्षे गटाच्या फिफा विश्वचषक

FIFA Young World Cup infrastructure ready: Seppi | फिफा युवा विश्वचषकासाठी पायाभूत सुविधा सज्ज : सेप्पी

फिफा युवा विश्वचषकासाठी पायाभूत सुविधा सज्ज : सेप्पी

Next

नवी दिल्ली : २०१०च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तयारीसारखी अखेरच्या क्षणी नाचक्की होऊ नये याची काळजी घेत १७ वर्षे गटाच्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी पायाभूत सुविधांची उभारणी आधीच सज्ज करण्यात आल्याची माहिती स्थानिक आयोजन समितीचे संचालक झेव्हियर सेप्पी यांनी दिली आहे.
या आयोजनाकडे भारतात फुटबॉल क्रांतीच्या दृष्टीने पाहिले जात आहे. सर्व स्टेडियम आणि सराव स्थळे जागतिक दर्जाची असतील. सेप्पी म्हणाले, ‘फिफा १७ वर्षे गटाच्या विश्वचषकास अद्याप सात महिने शिल्लक आहेत. पण, संपूर्ण तयारी वेळेच्या आत पूर्ण करण्यात येत आहे. सर्वच स्टेडियमच्या डागडुजीचे काम एप्रिलपर्यंत संपणार आहे. भारतात पायाभूत सुविधांची सज्जता अखेरच्या क्षणापर्यंत पूर्ण होत नाही, हा समज आम्ही खोटा ठरविणार आहोत. स्टेडियममधील सांडपाणी व्यवस्था, विद्युत व्यवस्था, मीडियाबॉक्स, ड्रेसिंग रूम ही सर्व कामे वेळेच्या आत पूर्ण करण्यात येत आहेत.’
सेप्पी यांची नोव्हेंबर २०१४ मध्ये संचालकपदी नियुक्ती झाली. त्यावेळी काम कासवगतीने सुरू होते. त्यांच्या उपस्थितीत कामांनी वेग घेतला. डिसेंबर २०१४ मध्ये फिफाच्या चमूने पाहणी दौरा केला. यानंतर मागच्या फेब्रुवारी आणि आॅक्टोबरमध्ये पुन्हा दोन पाहणी दौरे झाले. (वृत्तसंस्था)

ही प्रक्रिया दीर्घ होती. भारतात कामाची सुरुवात व्हायला वेळ लागतो. भारतातील आयोजन अन्य राष्ट्रांच्या तुलनेत वेगळे आहे. येथे लालफितशाहीचा मोठा अडसर आहे. वेगवेगळ्या राज्य शासनांकडे मागण्या करण्यात आल्या. यातील चांगली बाब ही की सर्वच शासनांकडून जबाबदारीने सहकार्य लाभले. - झेव्हियर सेप्पी, संचालक स्थानिक आयोजन समिती

दृष्टिक्षेपात आयोजन
च्स्पर्धेचा कालावधी : ६ ते २८ आॅक्टोबर २०१७
च्आयोजन स्थळे : दिल्ली, कोलकाता, गुवाहाटी, मडगाव, कोच्ची आणि नवी मुंबई.
च्संघ : २४, सामने: ५२, प्रेक्षक : २०० देशांतील जवळपास
२० कोटी.

Web Title: FIFA Young World Cup infrastructure ready: Seppi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.