जमिनी मिळवण्यासाठी सरकार विरोधात लढा उभारा!

By Admin | Published: March 14, 2016 12:04 AM2016-03-14T00:04:46+5:302016-03-14T00:04:46+5:30

जळगाव : जंगल, जमिनींवर आदिवासींचा खरा हक्क आहे. परंतु दुर्दैवाने आज आदिवासी बांधवच भूमिहीन झाला आहे. जगण्यासाठी आदिवासींना संघर्ष करावा लागत आहे. श्रीमंतांचे सरकार असल्याने त्यांना आदिवासींचा विसर पडला आहे. हक्क मिळवण्यासाठी आपल्याला सरकारला वठणीवर आणावे लागणार आहे. त्यासाठी जेलमध्येही जाण्याची तयारी ठेवा. आपल्या जमिनी परत मिळवण्यासाठी सरकार विरोधात लढा उभारा, असा सूर राज्यव्यापी आदिवासी हक्क परिषदेत उमटला.

Fight against the government to get the land! | जमिनी मिळवण्यासाठी सरकार विरोधात लढा उभारा!

जमिनी मिळवण्यासाठी सरकार विरोधात लढा उभारा!

googlenewsNext
गाव : जंगल, जमिनींवर आदिवासींचा खरा हक्क आहे. परंतु दुर्दैवाने आज आदिवासी बांधवच भूमिहीन झाला आहे. जगण्यासाठी आदिवासींना संघर्ष करावा लागत आहे. श्रीमंतांचे सरकार असल्याने त्यांना आदिवासींचा विसर पडला आहे. हक्क मिळवण्यासाठी आपल्याला सरकारला वठणीवर आणावे लागणार आहे. त्यासाठी जेलमध्येही जाण्याची तयारी ठेवा. आपल्या जमिनी परत मिळवण्यासाठी सरकार विरोधात लढा उभारा, असा सूर राज्यव्यापी आदिवासी हक्क परिषदेत उमटला.
आदिवासी एकता परिषदेच्या वतीने रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मेहरूण परिसरातील शिवाजी उद्यानात राज्यव्यापी आदिवासी हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी सुभाष नाईक होते. तर आदिवासी एकता परिषदेचे संस्थापक तथा ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक वाहरू सोनवणे, ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ.महेश मोरे, जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड, महानगराध्यक्ष करण सोनवणे, कार्याध्यक्ष आत्माराम पवार, सचिव डोंगर बागुल, आदिवासी तडवी भिल्ल मंचचे उपाध्यक्ष इब्राहीम तडवी, उत्तम निकम, जिल्हा सचिव जया सोनवणे, धनसिंग ठाकरे, आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष अमित तडवी आदींची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते वीर एकलव्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून परिषदेचे उद्घाटन झाले. त्यानंतर सुनील गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन जया सोनवणे यांनी केले.
या विषयांवर झाले परिषदेत मंथन
आदिवासी बांधवांकडून बेकायदेशीररीत्या हस्तांतरीत केलेल्या जमिनी त्यांना सन्मानपूर्वक परत करण्यात याव्यात, आदिवासी व वनविभाग क्षेत्रासह गैर आदिवासी क्षेत्रातील धरण व जलाशयांचे अधिकार आदिवासींना देण्यात यावेत, शेतीच्या उद्देशाने आदिवासींनी शासकीय जमिनीवर केलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्यात यावे, २४ डिसेंबर १९९६ रोजी भुरिया समितीने केलेल्या पेसा संदर्भातील शिफारसींमध्ये कोणताही बदल न करता त्या त्वरित लागू कराव्यात, प्रत्येक भूमिहीन आदिवासीला किमान ५ एकर जमीन द्यावी, अशा विषयांवर परिषदेत मंथन झाले.
आदिवासी संस्कृती सर्वश्रेष्ठ : वाहरू सोनवणे
आदिवासी संस्कृती ही जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. या प्राचीन संस्कृतीवर गैर आदिवासींकडून अतिक्रमण केले जात आहे. हे अतिक्रमण आपल्याला रोखायचे आहे. गैर आदिवासींमुळे खर्‍या आदिवासींचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. आदिवासींना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. हे स्थिती बदलण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत वाहरू सोनवणे यांनी व्यक्त केले.

Web Title: Fight against the government to get the land!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.