एफआयएच प्रो लीग : पुरुष हाॅकी संघात जुगराज, अभिषेक यांना संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 05:22 AM2022-01-28T05:22:17+5:302022-01-28T05:22:47+5:30
ऑलिम्पिक कास्य विजेते १४ खेळाडू कायम
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत यजमान संघ आणि फ्रान्सचा समावेश असलेल्या एफआयएच प्रो लीगसाठी २० सदस्यांचा भारताचा पुरुष हाॅकी संघ गुरुवारी जाहीर झाला. ड्रॅग फ्लिकर जुगराजसिंग आणि अभिषेक या दोन नव्या चेहऱ्यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.
८ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत सामने खेळले जातील. अनुभवी खेळाडूंच्या या संघात टोकियोत कास्य जिंकणाऱ्या संघातील १४ खेळाडूंना कायम ठेवण्यात आले आहे. भारतीय संघ ४ फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथून दक्षिण आफ्रिकेकडे रवाना होईल, असे हॉकी इंडियाने म्हटले आहे.
भारतीय पुरुष हॉकी संघ
गोलकीपर : पीआर श्रीजेश आणि कृष्ण बहादूर पाठक. बचाव फळी : हरमनप्रीतसिंग, अमित रोहिदास, सुरेंदर कुमार, वरुण कुमार, जरमनप्रीतसिंग आणि जुगराजसिंग.
मधली फळी : मनप्रीतसिंग, निलाकांत शर्मा, हार्दिकसिंग, जसकरणसिंग, शमशेरसिंग,आणि विवेक सागर प्रसाद. आक्रमक फळी : मनदीप सिंग, ललित कुमार उपाध्याय, आकाशदीप सिंग, शिलानंद लाक्रा, दिलप्रीतसिंग,आणि अभिषेक