..तर अंडर-१९ सामने भरवू : वेंगसरकर

By admin | Published: January 10, 2017 01:36 AM2017-01-10T01:36:46+5:302017-01-10T01:36:46+5:30

भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंडर-१९ मालिकेचे यजमानपद स्वीकारण्यास तमिळनाडू क्रिकेट संघटना अजूनही तयार नाही. त्यामुळे

Fill in the under-19 front: Vengsarkar | ..तर अंडर-१९ सामने भरवू : वेंगसरकर

..तर अंडर-१९ सामने भरवू : वेंगसरकर

Next

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंडर-१९ मालिकेचे यजमानपद स्वीकारण्यास तमिळनाडू क्रिकेट संघटना अजूनही तयार नाही. त्यामुळे ही मालिका स्थलांतरित करायला हवी. ही मालिका मुंबईत व्हावी, असे मत माजी मुख्य निवडकर्ते दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले.
माजी कर्णधाराच्या नात्याने सांगायचे झाल्यास टीएनसीए ही स्पर्धा आयोजित करण्यास अकार्यक्षम असेल, तर ती संधी मुंबईला मिळावी; कारण मुंबई इतर शहरांच्या तुलनेत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने आयोजनाचे स्थळ आहे.
टीएनसीएकडे पर्यायी मैदान नाही. जास्तीत जास्त ते चेपॉकच्या चिदंबरम स्टेडियम येथे इंग्लंडविरुद्धचे सामने आयोजित करू शकतात. मुबईला रिझर्व्ह स्थळ म्हणून विचार करावा. यासोबत मुंबईला भारत-बांगलादेश कसोटीचे बॅक-अप स्थळ मानले जात आहे. जर हैदराबाद कोणत्याही कारणामुळे सामना आयोजन करण्यास तयार होत नसेल तर मुंबईला संधी मिळावी. माझ्या मते, ही क्रिकेटची प्राथमिकता असावी. हा कार्यक्रम बऱ्याच दिवसांपासून तयार करण्यात आला होता आणि यामध्ये कोणतीही समस्या निर्माण होऊ नये.

Web Title: Fill in the under-19 front: Vengsarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.