सेरेना, मुगुरुजा यांच्यात अंतिम झुंज
By admin | Published: June 4, 2016 02:21 AM2016-06-04T02:21:58+5:302016-06-04T02:21:58+5:30
जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू अमेरिकेची सेरेना विलियम्स आणि चौथी मानांकित स्पेनची गरबाईन मुगुरुजा ब्लांको यांच्यात फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत विजेतेपदाची झुंज रंगणार आहे.
पॅरिस : जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू अमेरिकेची सेरेना विलियम्स आणि चौथी मानांकित स्पेनची गरबाईन मुगुरुजा ब्लांको यांच्यात फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत विजेतेपदाची झुंज रंगणार आहे.
अव्वल मानांकित आणि गत चॅम्पियन सेरेनाने संघर्षपूर्ण लढतीत हॉलंडच्या किकी बर्टन्स हिचा ७-६, ६-४ असा पराभव केला, तर मुगुरुजाने जबरदस्त कामगिरी करताना आॅस्ट्रेलियाच्या सामंथा स्टोसूर हिचे आव्हान
६-२, ६-४ असे मोडून काढत प्रथमच फ्रेंच ओपनमध्ये अंतिम फेरीत धडक मारली.
फ्रेंच ओपनमध्ये विजेतेपदाची हॅट्ट्रिक करणारी सेरेना आता जर्मनीची महान खेळाडू स्टेफी ग्राफच्या २२ ग्रॅण्डस्लॅमच्या विक्रमाची बरोबरी करण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे; परंतु तिला विजेतेपदाच्या लढतीत मुगुरुजा हिचे कडवे आव्हान परतवून लावावे लागणार आहे. मुगुरुजाने आतापर्यंत या स्पर्धेत सुरेख कामगिरी केली आहे. मुगुरुजाने प्रथमच फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये धडक मारली. हा तिसरा दुसरा ग्रॅण्डस्लॅम फायनल आहे. गतवर्षी तिला विम्बल्डनमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मुगुरुजाने पूर्ण सामन्यात जबरदस्त कामगिरी करताना २१ व्या मानांकित स्टोसूरला डोके वर काढण्याची उसंत मिळू दिली नाही. चौथ्या मानांकित खेळाडूने सामन्यात ९ पैकी पाच ब्रेक गुण घेतले आणि २0 विनर्स मारले. स्टोसूरने पाचपैकी २ ब्रेक गुण मिळविले; परंतु तिने २0 निरर्थक चुका केल्या आणि सहा दुहेरी चुका केल्या आणि हीच बाब तिच्या पराभवास कारणीभूत ठरली. मुगुरुजा १६ वर्षांनंतर फ्रेंच ओपन फायनलमध्ये पोहोचणारी पहिली स्पेनिश खेळाडू बनली आहे. याआधी स्पेनच्या अरांत्सा सांचेझ व्हिकारिओ आणि कोचिंता मार्टिनेज उपांत्य फेरीत आमने-सामने होत्या.
सेरेनाला युवा खेळाडू बर्टन्स हिला पराभूत करण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. सेरेनाने पहिला सेट टायब्रेकमध्ये ९-७ असा जिंकला. पहिल्या सेटमध्ये युवा डच खेळाडू सनसनाटी निकाल नोंदवील असेच चिन्ह होते; परंतु येथे २00२, २0१३ आणि २0१५ मध्ये विजेतेपद पटकाविणाऱ्या सेरेनाने आपला अनुभव पणाला लावताना रोमहर्षक अंदाजात टायब्रेक जिंकला.
दुसऱ्या सेटमध्येची नाट्यमय सुरुवात झाली आणि सेरेनाने तिची सर्व्हिस गमावल्याने ती 0-२ ने पिछाडीवर पडली; परंतु अमेरिकन खेळाडूने पुन्हा बर्टन्स हिची सर्व्हिस भेदताना मुसंडी मारली. तिने बर्टन्सला उर्वरित आठपैकी फक्त २ गेम जिंकू दिले आणि दुसरा सेट ६-४ ने जिंकताना अंतिम फेरीतील तिकीट पक्के केले.