ऑस्ट्रेलियाकडून पराभूत होऊनही भारत चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत
By admin | Published: June 17, 2016 08:57 AM2016-06-17T08:57:44+5:302016-06-17T12:13:42+5:30
ऑस्ट्रेलिया संघाकडून पराभव होऊनही भारतीय हॉकी संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारत इतिहास रचला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
लंडन, दि. 17 - भारतीय हॉकी संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारत इतिहास रचला आहे. कारण पहिल्यांदाचा भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे भारताचं पदक नक्की झालं आहे. विशेष म्हणजे साखळी सामन्यात पराभव स्विकारावा लागलेल्या ऑस्ट्रेलियासोबतच अंतिम सामना होणार आहे. ब्रिटन आणि बेल्जियममधील सामना बरोबरीत सुटल्याने भारत अंतिम सामन्यात पोहोचला आहे.
गुरुवारी झालेल्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 4-2 ने पराभूत केलं होतं. अंतिम सामन्यात प्रवेशासाठी ऑस्ट्रेलियासोबत ड्रॉ खेळण्याची गरज होती; मात्र या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर भारताच्या आशा ब्रिटन विरुद्ध बेल्जियम सामन्यावर होत्या. मात्र ब्रिटन विरुद्ध बेल्जियम सामना बरोबरीत सुटल्याने भारताचं अंतिम फेरीतील स्थान निश्चित झालं आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघ कधीत पोहोचलेला नाही. 1982 साली नेदरलँडमध्ये झालेल्या स्पर्धेत भारताने ब्राँझ मेडल पटकावलं होतं. ही भारताची या स्पर्धेतली सर्वोत्तम कामगिरी आहे.