वानखेडे स्टेडिअमवर आज ठरणार पहिला फायनलिस्ट

By admin | Published: May 16, 2017 12:59 PM2017-05-16T12:59:14+5:302017-05-16T12:59:14+5:30

आयपीएलच्या दहाव्या सत्रातील पहिला क्वालिफायरचा सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर सुरू होणार आहे.

The final fixtures will be held today at the Wankhede Stadium | वानखेडे स्टेडिअमवर आज ठरणार पहिला फायनलिस्ट

वानखेडे स्टेडिअमवर आज ठरणार पहिला फायनलिस्ट

Next
style="text-align: justify;">ऑनलाईन लोकमत
मुंबई, दि. 16 - आयपीएलच्या दहाव्या सत्रातील पहिला क्वालिफायरचा सामना आज मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर सुरू होणार आहे.  महाराष्ट्र डर्बीतील हा सामना अव्वल स्थानावरच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध पुणे सुपर जायंट्स यांच्यात होईल. या स्पर्धेकडे पाहता या आधी दोन्ही संघादरम्यान झालेल्या सामन्यात मुंबईला पराभव पत्करावा लागला आहे. मुंबईच्या संघाने यास्पर्धेत जवळपास सर्वच सामन्यात आपले वर्चस्व राखले आहे. हा सामना मुंबईच्या होमग्राउंडवर होत असल्याचा फायदा संघाला नक्कीच होईल.
मुंबई संघाचा विचार करता रोहित शर्मा हा मुंबईकर असल्याने त्याला या खेळपट्टीची चांगली जाणीव आहे. आतापर्यंत या मैदानात झालेल्या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरतो. जो संघ नाणेफेक जिंकेल त्याच्या बाजुने सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता जास्त असते.  मुंबई संघाची बेंच स्ट्रेन्थही मजबूत आहे. हे त्यांनी केकेआर विरोधात दाखवून दिले. प्रमुख सहा खेळाडू बाजुला बसवल्यानंतरही विजय मुंबईनेच मिळवला.  
रोहित शर्माने या स्पर्धेत संघाची मधली फळी मजबूत केली. सलामीला लेंडल सिमन्स आणि पार्थिव पटेल असतील. त्यांनी आतापर्यंत जवळपास प्रत्येक सामन्यात संघाला चांगली सुरूवात करून दिली आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, मिशेल मॅक्लेघन, लसीथ मलिंगा, हरभजन सिंह, कर्ण शर्मा यांची भट्टी चांगली जमली आहे. प्रतिस्पर्धी संघाला ते फारसे जम बसु देत नाहीत. पुणे संघाचा विचार करता महेंद्र सिंह धोनीचा अनुभव ही संघाची सर्वात जमेची बाजु आहे. 
त्यासोबतच रोहित शर्मा प्रमाणेच अजिंक्य रहाणे देखील मुंबईकर आहे. वानखेडेची खेळपट्टी त्याचा देखील चांगली परिचित आहे. या खेळपट्टीवर त्याने पहिल्या सामन्यात ६० धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला होता. पुण्याच्या गोलंदाजीचा विचार करता शार्दुल ठाकूरने रविवारच्या सामन्यात पंजाबला गारद करण्यात मोठी भूमिका बजावली. वानखेडे स्टेडिअम त्याच्यासाठी देखील होमग्राउंड आहे. देशांतर्गत स्पर्धातून खेळताना या खेळपट्टीवर त्याने अनेक वेळा चांगली कामगिरी बजावली आहे.राहूल त्रिपाठी हा फटकेबाजी यशस्वी ठरतो. बेन स्टोंक्स या पुढे संघात नाही त्यामुळे कर्णधार स्मिथ याच्या चिंतेत भर पडली आहे. 
 
अष्टपैलु खेळाडूंचा विचार केला तर मुंबईकर सरस
ठरतात. मुंबईच्या फलंदाजीत देखील खोली आहे. आठव्या स्थानावर येणारा हरभजन किंवा कर्ण शर्मा देखील मोक्याच्या वेळी फटकेबाजी करु शकतात. हार्दिक पांड्या हा तर या स्पर्धेत अनेकवेळा सर्वात उजवा अष्टपैलु खेळाडू ठरला आहे. पोलार्ड आणि
 
कृणाल पांड्या देखील मॅचविनिंग खेळी करु शकतात.
या सामन्यात पराभूत होणा-या संघाला अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी असेल. त्यासाठी संघाला इलिमनेटरमध्ये खेळावे लागेल

Web Title: The final fixtures will be held today at the Wankhede Stadium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.