मुगुरुजा महिला एकेरीच्या अंतिम फेरीत
By admin | Published: July 10, 2015 01:50 AM2015-07-10T01:50:46+5:302015-07-10T01:50:46+5:30
स्पेनच्या गार्बाइन मुगुरुजाने पोलंडच्या अग्निरजस्का रादवांस्काला पराभूत करत प्रथमच विम्बल्डनच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.तीन सेटपर्यंत चाललेल्या
हरिपूर : स्पेनच्या गार्बाइन मुगुरुजाने पोलंडच्या अग्निरजस्का रादवांस्काला पराभूत करत प्रथमच विम्बल्डनच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.तीन सेटपर्यंत चाललेल्या या सामन्यात मुगुरुजाने रादवांस्काला ६-२,३-६,६-३ असे पराभूत केले.
मुगुरुजाने पहिल्यांदाच ग्रॅँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत तिचा सामना सेरेना विल्यम्स व मारिया शारापोव्हा यांच्यात होणाऱ्या सामन्यातील विजेत्याबरोबर होणार आहे.
१९ वर्षात प्रथम स्पेनच्या महिला खेळाडूने विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली आहे. मुगुरुजाच्या अगोदर अरांता सांचेझने १९९६मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. स्पेनच्या कोंचिता मार्टिनेझ हीने १९९४ मध्ये विम्बल्डन जिंकले होते.
मुगुरुजाने मागील वर्षी फ्रेंच ओपनमध्ये सेरेनाला पराभूत करत सनसनाटी निर्माण केली होती.मात्र, तिला मारिया शारापोव्हाला पराभूत करता आलेले नाही.मुगुरुजाने २०१४ व २०१५ मध्ये फ्रेंच ओपनच्या उप उपांत्यफेरीपर्यंत मजल मारली होती. यावर्षी मात्र तीने पहिल्यांचा विम्बल्डनच्या उपांत्यफेरीत प्रवेश मिळवला होता.
सहा फूट उंच असलेल्या मुगुरुजाने पहिल्यापासूनच रादवांस्कावर दबाव आणला होता.पहिल्या आणि पाचव्या सेटमध्ये तीने रादवांस्काची सर्व्हिस मोडून गुण मिळवला. पहिला सेट ३३ मिनिटात जिंकला. दूसऱ्या सेटमध्ये रादवास्काने आपला अनुभव पणाला लावत सलग सहा गेम जिंकून सेट जिंकला. मात्र तिसऱ्या सेटमध्ये मुगुरुजाने पुनरागमन करत चुकांची दुरुस्ती केली. तिसरा सेट जिंकून मुगुरुजाने प्रथमच विम्बल्डनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.